श्रावण महिन्यात देवीची ओटी कशी भरावी.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

अध्यात्म

आपल्या मराठी लोकांसाठी श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना असतो. या महिन्यात शेतकार्याची सर्व शेतीची कामे आटपतात आणि शेतकरी बंधू आराम करतात. या महिन्यातच आपले सण-उत्सव सुरु होतात खूप विविध पूजा तथा विधी नुसार अनेक देवांना प्रसन्न केले जाते. आपल्या कुळ-देवीची पुर्ण श्रद्धा आणि पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार ओटी भरली जाते.

   

तर अनेक सेवेकरुनचा असा ही प्रश्न असतो की आम्ही आमच्या कुळ-देवीची ओटी घरातच कशाप्रमाणे भरु ज्याने सगळे विधी ही निर्विघ्न परिने पुर्ण होतील आणि देवी ही प्रसन्न होवून आपल्यावर तिची कृपा बरसवेल. मित्रांनो चला तर पाहूया घरीच राहून आपल्या कुळ-देवीची योग्य रित्या ओटी कशी भरली जाते.

मित्रांनो जर तुम्हाला या पवित्र श्रावण महिन्यात तुमच्या कुळ-देवीची ओटी भरावयची असेल तर देवीचा वार म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार अति शुभ आहेत परंतू हे शक्य नसेल तर श्रावणातील पावन वार म्हणजे सोमवार अथवा गुरुवार निवडू शकता. देवीची ओटी भरण्यासाठी आधी एक सुती साडी घ्यावी साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण साडीच्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरुन ठेवण्याची क्षमता असते.

हे वाचा:   स्वयंपाक घरात भिंतीवर लावा ही एक वस्तू घरात कधीही अन्नाची कमी होणार नाही...

त्यांनतर आपल्या दोन्ही हातच्या ओंजळीवर साडी घ्यावी आणि त्यावर खण ठेवावा त्यावर नारळ आणि नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने करावी. आपल्या हातची ओंजळ ही छातीच्या बरोबर येईल अश्या पद्धतीने उभे रहावे. देवीकडून चैतन्य येईल व आपल्या अध्यात्मिक उन्नती व्ह्यवी म्हणून देवीला मनापासून भावपुर्ण प्रार्थना करावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा आणि तांदळाने तिची ओटी भरावी.

तांदळ सर्व संपन्न असल्यामूळे चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यासाठी अग्रेसर असत म्हणूनच तांदळाचे ओटीत समाविष्ट केले जाते. त्यांनतर देवीच्या चरणावरील नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा. मित्रांनो ही खूप सोपी पध्दत आहे आपल्या घरच्या कुळ-स्वामिनीची ओटी भरण्याची तथा अश्या पद्धतीने तुम्ही देवीची योग्य रित्या ओटी भरलात तर तिची कृपा दृष्टी तुमच्यावर पडेल.

हे वाचा:   स्वामी सांगतात ज्या घरात अश्या स्त्रिया असतात त्या घरात भिकारी सुद्धा राजा बनतो..

तुमच्या आयुष्यातील नैराश्य दूर होईल चांगले दिवस सुरु होतील घरात पैसा-येण्यास सुरवात होईल. तुमच्या नोकरी-धंद्यात तुम्हाला यश मिळत जाईल तथा मुला -बाळांवर मातेची कृपा दृष्टी नेहमी राहिल.

मनात चांगले विचार ठेवा आणि जे काम कराल ते अगदी मन लावून करा कधी ही कोणाला पाण्यात पाहू नका आणि निंदा करण्यात वेळ वाया घालवू नका जर तुम्ही निष्ठेने काम करत रहाल तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि फल स्वरूपात तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि भरभराट प्रगट करेल. जर माहिती आवडली असेल तर सामायिक करण्यास विसरु नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply