घरासमोर लावा हे झाड माता लक्ष्मी शोधत येईल..हे झाड असते अत्यंत शुभ..

अध्यात्म

वास्तुशात्रा नुसार कोणती झाडे आपण आपल्या घराबाहेर ,घरासमोर आणि घराशेजारी लावावीत ? आणि कोणती झाडे लावू नयेत? झाडांचा आणि आपल्या प्रगतीचा खूप जवळचा सं-बंध मानला जातो.काही झाडे हि अत्यंत शुभ असतात. जी आपल्या घराची चारही बाजूनी प्रगती करतात. म्हणजेच तुमचा उद्योग असेल, तुमची नोकरी असेल या सर्व बाबींवरून आपली प्रगती होत असते.

   

त्यातून भरपूर पैसा घरी येत असतो.सुख समाधान येत असते .याउलट काही झाडे मात्र अशुभ मानली जातात.अशी झाडे आपल्या घरा समोर ,घरा शेजारी लावली तर वास्तुशात्रा नुसार हि झाडे अत्यंत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात .आणि आपल्या घराची अधोगती निर्माण होते.

घरात पैसा राहत नाही, वादविवाद निर्माण होतात.गरिबी येण्या बरोबरच अशांती,घरातील व्यक्तींमध्ये वाद, भांडणे होतात , अशा अनेक नकारात्मक गोष्टी घडून येतात. मित्रानो अनेक जणांचा वास्तुशात्रा वर किंवा कोणती झाडे लावावीत किंवा लावू नयेत यावर विश्वास नसतो.आम्ही तुम्हाला एक उदारहण देतो त्यावरून अनेक जणांचे वास्तुशात्रा बद्दल किंवा झाडांबद्दल असलेले गैरसमज दूर होईल.

रोजच्या उदाहरण वरून तुम्हीच पहा कि तुम्ही काम करून दमल्यानंतर ,जेव्झ जवळच्या बागेतून फेरफटका मारता.किंवा एखाद्या झाडाच्या सावलीत विसावा घेता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? साहजिकच तुम्हाला अत्यंत प्रफुल्ली आणि शांत वाटते आणि दुसरीकडे एखाद्या वाळवंटात गेलो म्हणजे एखाद्या शुष्क, ओसाड किंवा अतिकोरडा प्रदेशा मध्ये गेलो , तर तिथले काटेरी झुडूप पाहून आपले मन प्रफुल्लीत होईल का? आनंदी किंवा शांती मिळेल का ?

या ठिकाणी आपले मन आजिबात प्रफुल्लीत होणार नाही. म्हणूनच मित्रानो आपण ज्या घरात राहतो,आपला जास्तीत जास्त वेळ ज्या ठिकाणी जातो त्याच ठिकाणी मन प्रफुल्लीत करणारे झाडे असतील तर आपले जीवन प्रफुल्लीत व आनंदी होईल. हि झाडे सकारात्मक उर्जा बाहेर टाकतात. आणि या सकारात्मक उर्जा मुळे आपले मन हि आनंदी होते.

हे वाचा:   घरापुढे लिंबाचे झाड असेल तर; सावधान..बघा घरात काय काय घडू शकते !

म्हणूनच मित्रानो आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि आपण आपल्या घराशेजारी, घरासमोर कोणती झाडे लावावीत कि ज्यामुळे आपले मन आनंदी, प्रफुल्लीत आणि उत्साही होईल. मित्रानो वड आणि पिंपळ हि झाडे हिंदू धर्मशात्रा नुसार अत्यंत शुभ मानली गेली आहेत ,परंतु हि झाडे मंदिरा जवळ असावीत घराजवळ नसावीत.

दुसर म्हणजे नारळाचे झाड ,अशी उंच झाडे किंवा ३ फुटापेक्षा उंच असणारी कोणतीहि मोठी झाडे हि मुख्य दरवाजा समोर नसावीत. अशी उंच झाडे घराच्या पाठीमागे असावीत. अशी झाडे जर आपल्या घराच्या मागे असतील तर आपल्या घरात पैसा टिकून राहतो. अनेकदा काय होतं. अनेक घरामध्ये भरपूर पैसा घरात येतो पण टिकत नाही.

आणि काही दिवसातच त्या घरात दारिद्रय येते. याचे कारण म्हणजे माता लक्ष्मी चे आगमन तर झाले पण स्थिर राहिले नाही. अस होऊ नये अस वाटत असेल, तर उंच वृक्ष हे नेहमी घराच्या पाठीमागे लावावीत. जर हे शक्य नसेल तर दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला हि झाडे तुम्ही लावू शकता. मात्र घरा समोर अशी उंच झाडे नसावीत.

चंदनाचे झाड हे सुद्धा खूप शुभ मानले जाते .त्याचप्रमाणे लीबांचे झाड हे सुद्धा खूप शुभ मानले जाते.काटेरी झुडूप घरासमोर लावू नये असे म्हटले जाते.पण यासाठी २ झाडे अपवाद आहेत. एक म्हणजे लिंबू चे झाड आणि दुसरे म्हणजे गुलाबाचे झाड. असे म्हणत्तात लिंबाचे झाड आपल्या घरातील अनेक वास्तुदोष नष्ट करते म्हणून हे झाड अवश्य लावावे.

याशिवाय कोणतेही काटेरी झुडूप दारात असेल त्वरित काढून टाका.कारण अशा झाडांमुळे घरातील व्यक्तींमध्ये वाद निर्माण होतात.या काटेरी झाडांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नकारत्मक उर्जा निर्माण होते.म्हणून अशी झाडे दारात लावू नयेत. दुसरे म्हणजे घरात झाडे लावावीत का ? तर याचे उत्तर आहे हो. घरात आपण वृक्षे म्हणजे झाडे लावली तरी चालते. पण कोणती झाडे लावावीत हे जाणून घ्या. घरात तुम्ही लहान झाडे लावू शकता.

हे वाचा:   अन्नावर राग केल्याने काय होते.? अन्नावर राग का करू नये.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

मात्र बोन्साली केलेले झाड लावू नये.तसेच घरावर चढणारे वेल घरात लावू नयेत.अनेक लोकांना आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे तुळस नेमक कोठे लावावी? तर मित्रानो ईशान्य दिशा तुळस लावण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते .हे शक्य नसल्यास पूर्व दिशेला हि तुळस लावू शकता.

घराचे मुख्य दार पूर्वेला असेल तर ,अंगणामध्ये तुळस लावू शकता .तुळस हि हिंदू धर्मामध्ये खूपच प्रवित्र आहे .तुळशी मध्ये आध्यात्मिक शक्ती आहे, तसेच तुळस औषधी वनस्पती आहे .म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात तुळस अवश्य लावावी .अनेक लोक म्हणतात कि आम्ही वास्तुशात्रा नुसार सर्व शुभ झाडे लावली आहेत तरीपण घरात पैसा टिकत नाही याचे कारण म्हणजे

आपण जी झाडांची निगा राखायला पाहिजे ती राखत नाही. मित्रानो जो झाडाखाली जो सुखलेला जो पाला पाचोळा असतो, तो मृत्यू च प्रतिक असतो .हा पाला पाचोळा मोठ्या प्रमाणामध्ये नकारत्मक उर्जा निर्माण करत असतो म्हणून. अशी अस्वच्छता जर झाडाखाली असेल तर याचा प्रभाव म्हणून आपली घराची प्रगती रोखली जाते. म्हणून झाडाखाली असा पाला पाचोळा न ठेवता वेळोवेळी स्वच्छ करावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply