पितृपक्षात अवश्य दान करा यापैकी कोणतीही वस्तू..पितरांच्या आशीर्वादाने 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील..

अध्यात्म

पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो. असे मानले जाते की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज यमलोकातून पृथ्वीवर येतात. आणि तर्पण स्वीकारल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद देतात. हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाची सुरुवात ही 20 सप्टेंबर पासून होऊन 6 ऑक्टोबर असणार आहे. या दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार तर्पण आणि पिंड दान आपन करू शकतो.

   

पितृपक्षात दान करणे खूप शुभ मानले जाते परंतु काही गोष्टी अश्या आहेत ज्या आपण पितृपक्षात दान केल्या तर पितर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. या वस्तू कोणत्या आहेत हे आज आपण पहाणार आहे.  या पितृपक्षात पहिली वस्तू आहे जी आपल्याला दान करायची आहे ती म्हणजे काळे तीळ, काळ्या तिळांचा वापर श्राद्ध पक्षाच्या वेळी पूर्वजांच्या पूजेसाठी केला जातो.

काळे तीळ हे भगवान विष्णूंना देखील खूप प्रिय आहेत श्राद्ध पक्षाच्या वेळेस आपण जेव्हा कोणतीही वस्तू दान करतो तेव्हा आपल्या हातामध्ये काळे तीळ आवश्य घ्यावे. असे मानले जाते की या दानाचे फळ पूर्वजांना जाते. जर तुम्हाला इतर कोणतीही वस्तू दान करायची असेल तरी सुद्धा तुम्ही हातात तीळ घेऊनच ती वस्तू दान करा. असे ही मानले जाते की काळे तीळ दान केल्याने पूर्वजांचे संकटापासून रक्षण होते.

हे वाचा:   वृश्चिक राशिभविष्य २०२२ : असे वर्ष तुमच्या आयुष्यात परत येणार नाही...होणार बक्कळ धनलाभ..तुमचे स्वप्नातले घर पूर्ण होईल

तुम्हाला जर कोणत्याच वस्तूच दान करणं शक्य नसेल तर फक्त काळे तीळ ही तुम्ही गरजूंना दान करू शकता. दुसरी वस्तू आहे चांदी शास्त्रामध्ये पूर्वजांचे निवासस्थान चंद्राच्या वरच्या भागात आहे. म्हणून चांदीपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. अस मानलं जातं की तांदूळ आणि दूध अश्या पांढऱ्या रंगाचे पदार्थ जर आपण दान केले तर यामुळे सुद्धा पूर्वज प्रसन्न होतात.

पुढची वस्तू आहे गूळ आणि मीठ पितृपक्षात गूळ आणि मीठ दान करणं खूप शुभ मानले जाते. जर तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडण होत आहेत घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये प्रेम नाही. तर अश्या वेळी गूळ आणि मीठ पूर्वजांच्या नावाने दान करा. गरुड पुराणामध्ये सुद्धा हे सांगितले आहे की या पितृपक्षामध्ये जर आपण गूळ आणि मिठाच दान केलं तर आपल्या घरातील अशांती, भांडण,कटकटी कायमच्या दूर होतात.

हे वाचा:   नखं का'पल्यानंतर गपचूप टाका या झाडाच्या मुळाशी..त्यानंतर चमत्कार बघा..संपूर्ण जग तुमच्या तालावर नाचेल

पुढची वस्तू आहे कपडे पितृपक्षात पितरांसाठी घालण्यायोग्य कपडे दान करणे शुभ मानलं जातं. या शिवाय चप्पल, छत्री याच दान करणं राहू केतू दोषासाठी निवारक मानलं जातं. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाच्या छत्रीचा दान करावा. असे मानले जाते की यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते.
तर या पितृपक्षामध्ये वरील पैकी कोणतीही एखादी वस्तू तुम्ही आवश्य दान करा. जेणे करून तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि कोणत्याही वस्तूचे दान करताना हातात काळे तीळ घ्यायला मात्र विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply