मित्रांनो आपण पैसा तर कमावतो तुमच्या घरात भरपूर पैसा येतो पण हा पैसा टिकत नाही तर हा पैसा का टिकत नाही तर या मध्ये दोन गोष्टी असतात. एक तर वास्तूशास्त्राचा दोष आसतो आणि दुसर म्हणजे ग्रहांचा दोष असतो जरी आपण ग्रहांची स्थिती बदलू शकत नसलो, तरी वास्तुशास्त्र म्हणजे तुमच्या घरात आश्या काही गोष्टी आहेत.
जर त्या व्यवस्थित तुम्ही बदल्या तर तुमचा जो पैसा आहे ते टिकणार आहे वाढणार आहे तुमची संपत्ती चांगली राहणार आहे. तर आश्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरातल्या त्या जर तुम्ही बदल्या तर तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे भरभराट होणार आहे घरामध्ये आनंदी आनंद राहणार आहे.
पहिली गोष्ट तुम्ही जिथेही तुमचा पैसा धन ठेवता त्या ठिकाणची जागा तो रंग जो आहे तो निळा नसावा लक्षात ठेवा जिथेही तुम्ही तुमच धन ठेवता ती जागा निळ्या रंगाची नसावी. कारण निळा रंग शनि देवताचा रंग आहे त्यामुळे धनाची जी प्राप्ती आली आहे ते धन जे तुमच आहे ते निघून जात.
आपल्या घरातील धन पैसा संपत्ती हे ठेवण्याची जी जागा आहे ती ठेवण्याची दिशा जी आहे ती पूर्व किंवा पश्चिम असावी उत्तर किंवा दक्षिण असू नये. याने काय होत तर पूर्व पश्चिम दिशेल तुम्ही तुमची संपत्ती ठेवली तर तिच्यात वाढ भरभराट होत असते. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडत असते आणि म्हणून ज्या घरामध्ये स्वच्छता चांगली असते तिथे लक्ष्मी माता वास करते
आणि त्यामुळे वास्तुशास्त्रात साफ सफाईला अतिशय महत्व आहे. आणि वास्तुशास्त्रा नुसार घरामध्ये तुटलेला आरसा, कपाट नसाव किंवा ज्या तु-टक्या फु-टक्या ज्या वस्तू आहेत ते लगेच बाहेर काडून दयायचे आहेत घरात साफ सफाई असावी. अशा साफ सफाई असलेल्या ठिकाणी आपल देवघर असल पाहिजे देवघराची दिशा हे पुर्व दिशेला असावी किंवा पश्चिम दिशेला असली पाहिजे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे तुमच पाकीट आहे किंवा महिलांची पर्स आहे त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा एक फोटो असावा. त्याच बरोबर एक सिक्का एक रुपयाचा दोन रुपयाचा कुठलाही सिक्का तो सिक्का नक्की पर्स किंवा पाकीट मध्ये असावा त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते धन संपत्ती तुम्हाला मिळणार असते.
पैसा ठेवण्याची जी जागा आहे तिथे तुम्ही एक सुपारी ठेवायची आहे आणि कुबेर यंत्र ठेवायचे आहे. कुबेर यंत्र मिळत नसेल तर नुसतीच सुपारी जरी ठेवली हळद कुंकू लावून ती सुपारी त्याठिकाणी ठेवायाची आहे. आपण दिवाळीच्या वेळेस कोणत्याही सणाच्या वेळेस महालक्ष्मीची पूजा करताना पान सुपारी आपण ठेवत असतो त्या पद्धतीची सुपारी ती सुपारी ठेवायची आहे.
नक्की तुमचे धन वाढणार आहे तुमची संपत्ती वाढेल. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात प्रवेश करता जो तुमचा हॉल आहे त्या हॉल मध्ये जिथे नजर जाईल आश्या ठिकाणी आपल्याला मोरपीस ठेवायच आहे मोरपीस ठेवल्याने सकारात्मक प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते आणि चांगल्या गोष्टी घडतात.
घरात आनंदी आनंद राहतो पैसा टिकत असतो. आणि या काही साध्या गोष्टी आहेत जे आपण नक्कीच केल पाहिजे. जे तुमच घराच छत आहे त्या छतावर काही भंगार गोष्टी ठेवायच नाही बऱ्याचवेळा आपल्या घरी बिनकामच्या वस्तू असतात आणि आपण ते छतावर टाकून देतो. त्याला आपण भंगार म्हणतो पण छतावर भंगार गोष्टी ठेवायच नाही यामुळे घरात धन संपत्तीची हा नी होते.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.