नमस्कार मित्रांनो, वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. परंतु त्यामध्ये काही पोर्णिमाचे खूप महत्व आहे. त्यातील एक पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी लक्ष्मी कृपे साठी विशेष काही उपाय केले जातात. लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते श्री भगवान विष्णूंचे पूजन केले जाते.
तसेच या दिवशी मानले जाते की आकाशातून अमृत वर्षा होते. त्यामुळे पोर्णिमेचे महत्व हे अनेक पटीमध्ये आहे. त्यामुळे या दिवशी विशेष उपायाचे फळ हे अनेक पटीमध्ये लागत असते. तर आपण कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री या ठिकाणी काढा स्वस्तिक सर्व मनोकामना पूर्ण होतील.
यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर मंगळवार रोजी आलेली आहे. आणि यावर्षी पौर्णिमा दोन तिथी मध्ये विभागून आलेली आहे. पौर्णिमा तिथीला रात्री काळच महत्व आहे त्यामुळे मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदय व्यापीनी पौर्णिमा आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्रत धरू शकतात. हा उपाय आपल्याला लक्ष्मी कृपेसाठी व श्री हरी विष्णू यांच्या कृपा प्राप्ती साठी करायचा आहे.
तर या पौर्णिमेच्या रात्री आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला कुंकू ओल करून घ्यायच आहे. आणि एखाद्या काडीला पुढे कापूस लावून अथवा बोटाने हे आपल्याला सुर्यास्था नंतर घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूस या ओल्या कुंकुवाणे स्वस्तिक काढायचं आहे. तसेच घरच्या पूजा स्थळाच्या ठिकाणी स्वयंपाक ग्रह या ठिकाणी देखील आपण हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे.
तसेच आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या बसण्याच्या ठिकाणी देखील हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि कायम घरामध्ये वास्तव्यस राहील. म्हणून या कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मी प्राप्ती साठी आपल्या घरी नक्की हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे.
माता लक्ष्मीचे पूजन करायचे आहे लक्ष्मी स्त्रोत्र पठाण करायचे आहे तसेच लक्ष्मी नाम जप करायचे आहे. तसेच या दिवशी भगवान शिव कुटुंबाचे पूजनाचे देखील विशेष विधान आहे. त्यामुळे कोजागिरी रात्रीच्या दिवशी हा विशेष उपाय नक्की करा.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.