6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या गुपचूप जाळा; इथे ही 1 वस्तू इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..

अध्यात्म

पितृपक्ष सुरू आहे जो संपत आला असून 6 ऑक्टोबर बुधवारचा दिवस आणि या दिवशी सर्वपित्री दर्श अमावस्या आलेली आहे. या अमावस्या तिथीस एक छोटासा उपाय नक्की करा, ज्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी, समस्या बाधा नक्कीच दूर होतील.

   

काही बाधा झाली असेल तर ती काहीही असो, कितीही मोठी आणि त्यामुळे जर तुमची प्रगती होत नसेल, प्रत्येक कामात अडचण येत असेल, घरात सतत आजारपण असेल, तब्येत सुधारत नसेल, तब्येत साथ देत नसेल तर हा एक छोटासा उपाय या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केल्यास भगवान शिव शंकर यांच्या कृपेने महादेव कृपेने या सर्व समस्या नक्की दूर होतील.

आपल्या जवळपास कोणतेही महादेवाचे मंदिर चालू नसेल तरीसुद्धा एक मंदिर तुमच्या जवळपास नक्की असेल की ज्या ठिकाणी दरवाजे बंद नाहीत, अशा मंदिरात तुम्हाला जायचं आहे, पण ज्यांना शक्य नसेलच तर आपल्याच देवघरात शिवलिंग असेल तरीही चालेल.

केवळ वाटीभर तांदूळ घ्या, अखंड तांदूळ, तांब्याभर पाणी घ्या आणि थोडंसं जल या शिवलिंगावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. महादेवाला सर्वाधिक प्रिय असणारा अभिषेक म्हणजे जलाभिषेक होय. जल अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.

हे वाचा:   या’ दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची चूक अजिबात करू नका…अन्यथा आपल्या हातून खूप मोठे पाप घडेल

जल अर्पण करताना शुद्ध,पवित्र भाव ठेवा, मन विचलित करू नका, तसेच पूर्ण श्रद्धेने जल अर्पण करा, महिला असतील तर नमः शिवाय नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा जप करा, पुरुषांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मंत्रजप चालू ठेवत जल अर्पण करा. भोलेनाथ जल अर्पण केल्याने देखील प्रसन्न होतात, तरीही शक्य असल्यास सफेद फुले,बेल,भस्म अशी विधिवत मनोभावे पूजा करा. यानंतर तांदूळ जे आपण घेऊन गेलेले होतो हे तांदूळ हे जल अर्पण करताना शिवलिंगा जवळ किंवा महादेवाच्या चरणी नक्की ठेवा.

आता महादेवाला मनोभावे हात जोडून प्रार्थना करा, नतमस्तक व्हा आणि आपली समस्या बोलून दाखवा आणि या समस्येतून सुटका करण्यासाठी प्रार्थना करा आणि नंतर आपल्या घरी ते तांदूळ घेऊन या, घरी केला असेल तर देवघरातून ती वाटी उचला व ती वाटी आपल्याला बाहेर घेऊन यायची आहे.

हा उपाय तुम्ही रात्री दहा नंतर ते अकरा साडेअकरा वाजेपर्यंत , बाराच्या आधीच करा. दहा नंतर ते तांदूळ घ्या, तुम्ही तुमच्या घरात जिथून प्रवेश करता त्या ठिकाणी हे तांदूळ आपण ठेवायचे आहेत. तुमच्या घराला जर गेट असेल तर त्या गेटच्या बाहेर ठेवायचे आहे. 7 ते 8 कापराच्या वड्या तांदळावर ठेवायचे आहेत, तो कापूर प्रज्वलित करायचा आहे, त्या कापरा सोबत थोडे तांदूळ देखील जळतील.

हे वाचा:   महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

ती वस्तू प्रज्वलित केल्यानंतर ताबडतोब आपण आतमध्ये निघून यायचा आहे, हे करताना कुठेही आग लागणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घ्या आणि आपण आपल्या घरात या, स्वच्छ हात पाय तोंड धुवा.मग जाऊन देवा समोर नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करा की आपल्या जीवनातील समस्या दूर होऊदेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदुळ एका कोणत्याही झाडाखाली पक्षांसाठी चिमण्यांसाठी कावळ्याला त्या ठिकाणी टाकून द्या आणि घरी परत या. घरी परत येऊन ती वाटी स्वच्छ धुवून घ्या. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देवाकडे प्रार्थना करा. सर्वपित्री अमावस्याला केलेला हा छोटासा उपाय जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या महादेवांच्या भोलेनाथ यांच्या कृपेने नक्की दूर होतात.

Leave a Reply