दिवाळीच्या या दिवशी पाकिटात गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; पाकीट नेहमी भरलेलं राहील..लक्ष्मी सदैव सोबत राहील..जाणून घ्या

Uncategorized

दिवाळी चे दिवस सुरू आहेत, आज धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे जीवनातील सुख, समृद्धी,ऐश्वर्य टिकून राहते. तसेच बऱ्याचदा मेहनतीला योग्य मोबदला मिळतो पण पैसे जे कमावलेले असतात ते नाहक खर्च होत राहतात.

   

विनाकारण या ना त्या कारणाने पैसे संपून जातात, हिशेबात गल्लत होते व शेवटी काही न काही कारणाने आपले पैशाने भरलेले पाकीट रिकामे होते. अर्थातच यामध्ये आपल्या देखील काही छोट्या छोट्या चुका होत असतात त्यामुळे तुम्ही हे टाळण्यासाठी या दिवाळीत हा 1 छोटा साधा उपाय नक्की करा. दिवाळी म्हणजे सण प्रकाशाचा, माता लक्ष्मीचा, धनप्राप्ती साठी आपण या दिवशी मातेकडे मनापासून प्रार्थना करायची आहे.

हिंदू ध र्म शास्त्रात खूप सारे महत्वाचे विभिन्न शास्त्र सांगितले आहे जसे स्वप्न शास्त्र, ज्योतिष शास्त्र, स्पर्श शास्त्र त्यातील स्पर्श शास्त्र त्याचा वापर करून आपल्या पॉकेटमध्ये या दिवाळीत एक अशी वस्तू नक्की ठेवा की ज्यामुळे पॉकेट मधील पैशात सातत्याने वाढ होत राहील.जेवढा पैसा तुम्ही खर्च कराल त्यापेक्षा जास्त पैसा हा तुमच्या पॉकेटमध्ये येत राहील , पैशांनी भरलेलं राहील, दिवाळीमध्ये आपण हा उपाय करायचा आहे.

यासाठी फार काही विशेष खरेदी नाही करावी लागणार व खर्च देखील भरपूर नाहीये, एक हिरव्या रंगाचा छोटासा कपडा लागेल , जर रेशमी असेल तर अति उत्तमच आहे, यामुळे नकारात्मक प्रभाव घडत नाही पण सुती, रेशमी कपडा नसेल तरी चालतो. साधा हिरव्या रंगाचा कागद घेतला तरीही काही हरकत नाही. पण दोन्ही बाजूला हिरवा रंग असावा, असा हिरव्या रंगाचा कागद किंवा कपडा घ्या, यानंतर दोन हिरव्या विलायची लागतील, या विलायची ताज्या असाव्यात,

खूप वाळून गेले असतील तर त्यांचा तेवढा प्रभाव पडत नाही म्हणून ताज्या हिरव्या विलायची घ्या, यानंतर तिसरे म्हणजे थोडीशी बडीशेप, जी आपण रोज खातो ती, त वस्तू वापरण्याचं देखील कारण आहे जे शास्त्रीय आहे, या सर्व वस्तू लक्ष्मी कारक आहेत, यानंतर जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर , सर्वात शुद्ध कापूर तंत्रशास्त्रात वापरला जाणार असा, हा कापूर शक्यतो घ्यावा याच महत्व थोडं जास्त आहे, या सर्व वस्तू आपण घेतलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधणार आहोत

हे वाचा:   लघुशंकेच्या ब्रेकसाठी कारमधून उतरला आणि बायकोलाच विसरला; १५० किमी प्रवास केल्यानंतर कळलं अन्…

. 2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती यमदीपदान असते, 4 तारखेला दीपावली आहे, गुरुवार आहे, नरक चतुर्दशी आणि भगवान कुबेरांच्या लक्ष्मीचे पूजन या दिवशी केलं पाहिजे. तशी प्रथा आहे. याच दिवशी आश्‍विन अमावस्या सुद्धा आहे आणि 5 तारखेला शुक्रवार आहे, 5 नोव्हेंबर रोजी या दिवशी दीपावली पाडवा आपण साजरा करतो. ज्यादिवशी व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असतो, नवीन व्यवसाय उदयाला येतात.

5 नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी दीपावली पाडवा आहे, यादिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठावे , सूर्योदय होण्यापूर्वी एक ते दीड तासांचा कालावधी जो असतो तो म्हणजेच ब्राह्म मुहूर्त,याच शास्त्रीय,अध्यात्मिक व वैज्ञानिक असे वेगळे महत्व आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि आपण लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय करत आहोत.

दिवाळीचा अजून एक महत्वाचा दिवस म्हणजे पाडवा ज्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते , पाडव्याच्या दिवशी शुक्रवारचा दिवस सूर्योदयाची ही वेळ जाणून घेण्यासाठी तुम्ही कॅलेंडर वापरा , सूर्योदय तुमच्या भागामध्ये किती वाजता होत आहे या दिवशी हे जाणून घ्या कारण या उपयात सर्वात जास्त महत्व हे वेळेचं आहे नाहीतर त्याचे लाभच मिळणार नाहीत . सूर्योदय झाल्यानंतर बरोबर बारा मिनिटांच्या आत , जर सात वाजता झाला तर सात वाजून बारा मिनिटांच्या कालावधीतच आपण हा छोटासा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   लग्न एकाशी अन् हनिमून दुसऱ्यासोबत; पळून गेलेल्या बायकोची नवऱ्याने झोपच उडवली, प्रियकराच्या पत्नीसोबत केलं असं काही…

वेळ आताच जाणून घेऊन लक्षात ठेवा, या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या कपड्यावर सामग्री ठेवून तुम्हज आपल्या देवघरासमोर बसा, देवघरासमोर आसन अंथरून बसा, त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करा आणि एका पाटावरती हिरवे कापड मांडून त्यावरती दोन हिरव्या विलायची, थोडीशी बडीशेप आणि भीमसेनी कापूर ठेवा, माता लक्ष्मी च्या बीज मंत्राचा मनातल्या मनात जप करा. यानंतर एका हिरव्या रंगाच्या दोऱ्याने आपण या कापडाचे पुरचुंडी बांधा, जी आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवणार आहोत.

सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सूर्योदय वेळ आणि त्यानंतर 12 मिनिटे,कारण शास्त्रीय पद्धतीने सर्व क्रिया या बारा मिनिटांच्या कालावधीत आपण पार पाडायचे आहे आणि त्यानंतर ही पोटली आपण मनोभावे आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचे. पॉकेट मध्ये किंवा पर्स मध्ये ती आतल्या कप्प्यात ठेवा ,तिथे केवळ ही पोटली असणार आहे आणि हे पॉकेट आपण सातत्याने स्वतः जवळ बाळगा, जेव्हा तुम्ही बाहेर जाल, व्यवहार करणं असेल हे पॉकेट सातत्याने स्वतःजवळ ठेवूनच द्यायचं. पुढे जाऊन जर तुम्ही पॉकेट बदलणार असाल तर काहीही करण्याची गरज नाही.

कोणत्याही शुक्रवारी व सूर्य उदय झाल्यानंतर पहिल्या बारा मिनिटात आपण जुन्या पॉकेट मधून नव्या पॉकेटमध्ये ही पोटली ठेवून द्या आणि त्याचा पुनर्वापर करा. हि पोटली वारंवार आपल्या शरीराला स्पर्श होत राहील. आपल्या शरीराच्या जवळपास राहील, स्पर्श होत राहील, या पोटलीच्या प्रभावाने मूलाधार चक्र सक्रिय बनेल आणि मूलाधार चक्र जेव्हा सक्रिय बनते त्या व्यक्तीचा आत्मबल वाढते, कार्य करण्याची क्षमता शक्ती वाढते, अधिक जोमाने ती व्यक्ती कार्य करू लागते आणि लक्ष्मी सुद्धा त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. खूप चमत्कार दिसेल, करत असलेल्या कामात यश मिळेल, अडचणी दूर होऊन अडकलेले पैसे येतील.

Leave a Reply