मनुष्य जीवन हे गतिमान असून मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहदशेच्या स्थितीनुसार मानवी जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याचा जीवनावर खुप मोठा परिणाम पडत असतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला जीवन नकोसे करून सोडते. जेव्हा ग्रहनक्षत्र नकारात्मक असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व काही नकारात्मक घडत असते.
कामात अपयश, कौटुंबिक कलह, अपमान, मानसिक ताणतणाव अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या काळात पैशांची तंगी देखील राहते. सुखसमाधान मिळत नाही पण हीच ग्रहदशा सुख आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त करून देते. जीवनात यश प्राप्त होण्यासाठी सकारात्मक ग्रहदशा असणे अत्यंत आवश्यक असते.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. हनुमानजी ची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. हनुमान आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. शनीचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडून आणू शकतो. शनिवार हा भगवान हनुमान या देवाचा दिवस आहे. जेव्हा हनुमान प्रसन्न होतात तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.
सुरवात करूया मकर राशी पासून. मकर राशीवर हनुमान जी विशेष प्रसन्न होणार आहेत. प्लुटोचे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. जे काम करत आहात त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशी साठी ग्रहनक्षत्र अनुकूल बनत आहे. प्लुटोचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडून आणणार आहे.
उद्योग व्यापारात चांगले दिवस येणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आत्तापर्यंत केलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतील.
यानंतर आहे धनु राशी. प्लुटोचे होणारे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. नव्या योजना साकार होणार आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
यानंतर आहे कन्या राशी. प्लुटोचे होणारे राशी परिवर्तन कन्याराशीसाठी यशदायी ठरणार आहे. हनुमान जी यांची शुभदृष्टी आपल्या राशीवर पडणार असून हा काळ आपल्या प्रगतीचा ठरणार आहे. या काळात करियर आणि कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. अनेक दिवसांपासून आपण योजलेल्या योजना आता साकार होणार आहेत. आपल्या अडलेला पैसा प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशी प्लुटोचे होणारे राशी परिवर्तन लाभकारी ठरण्याचे संकेत असून हनुमान जी यांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात धनलाभाचे अनेक योग चालून आपल्याकडे येणार आहेत.
आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अनेक दिवसांची मेहनत आता फळाला येणार आहे. कामात योजलेल्या योजना पुर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून येणार आहेत. आरोग्यात सुधारणा घडून येईल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे.
यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या कामात यश प्राप्त होणार असून आपले प्रयत्न सफल ठरणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.
न्यायालयीन कामे मार्गी लागणार आहेत. या काळात आपल्या प्रगतीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून वेसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.