असा असतो डिसेंबर मध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव..जाणून घ्या संपूर्ण माहिती..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, ज्योतिष शास्त्रात जसे तारीख व वेळेला महत्व दिले गेले आहे तसेच ज्या महिन्यात आपला जन्म झाला आहे त्याला सुद्धा विशेष महत्व असते. मित्रांनो या महिन्यात  ज्या व्यक्तीचा जन्म झालेला असतो ती व्यक्ती खूप मेहनती , बुद्धिमान व दयाळू स्वभावाचे असतात.

   

या व्यक्तींची आंतरिक शक्ती हि खूप चांगली असते. मित्रांनो या महिन्यात जन्म घेणाऱ्या लोकांमध्ये कमालीची सहनशक्ती असते. जो पर्यंत यांचा स्वाभिमान दुखावत नाही तोपर्यंत हे लोक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मित्रांमधळी भांडणे मिटावी म्हणून हे लोक नेहमी मध्यस्ती करत असतात.

सामान्यतः सर्व लोक तुम्हाला सौम्य व शांत स्वभावाच्या रूपात ओळखत असतील. परंतु ज्यांनी तुमचा राग पाहिला आहे त्यांनाच माहित असते कि तुमच्या आत केवढे मोठे वादळ दडलेले आहे. या व्यक्तींच्या बोलण्यात जणू काही एक जादूच असते. या व्यक्तीना वायफळ बोलायला आवडत नाही. मोजकेच पण कामाचेच बोलतात.

या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा खिसा नेहमीच पैशाने भरलेला असतो. म्हणजेच या व्यक्ती नेहमीच बँक बॅलन्स पाळून असतात. या व्यक्तींना पैशांची बचत करायला आवडते व पैसा योग्य ठिकाणीच वापरला जाईल याची बारकाईपणे काळजी हे व्यक्ती घेत असतात.

हे वाचा:   6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या गुपचूप जाळा; इथे ही 1 वस्तू इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..

या व्यक्तींना भाग्याची भरपूर प्रमाणात साथ भेटते. त्यामुळे यांना आयुष्यात कधीच धन , दौलत , पैसा यांची कधीच कमतरता भासत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांचा जन्म लोकांचे भले करण्यासाठीच झालेला असतो.

या व्यक्तींना लहान मुलांशी विशेष असा लळा असतो. हे लोक भूतकाळात झालेल्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. या व्यक्तींचे मन हे काचेप्रमाणे स्वच्छ , निर्मळ असते. हे व्यक्ती वेळेबाबत खूपच कडक शिस्त पाळत असतात. वेळ वाया घालवणे हे त्यांना अजिबात आवडत नाही.

या महिन्यात जन्म घेणारे व्यक्ती कोणतेही काम करताना खूप मेहनतीने आणि मन लावून काम करतात.या व्यक्तींचे करियर जास्त करून पोलीस , न्यायालय , मेडिकल क्षेत्र यांच्याशी जास्त संबंधित असतात. यांच्या मदतीस नेहमीच यांचे मित्र पुढे असतात.

या व्यक्तीने जर आपले करियर सर्जन , गुप्तचर , पत्रकार , पोलीस , आर्मी , मेडिकल या क्षेत्रांत केले तर त्यात जे यशस्वी होताना दिसतात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींचा स्वभाव खूपच भावनिक असतो. भूतकाळ लक्षात ठेवण्यात या मुलींचा हात कोणीच धरू शकत नाही.

हे वाचा:   गॅस (शेगडी) जवळ चुकूनही ठेऊ नका..या 5 वस्तू घर बरबाद होईल...वास्तुशास्त्र सोप्या शब्दात

या मुली प्रॅक्टिकल असतात तसेच या मुली आतून स्ट्रॉंगसुद्धा असतात. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा शुभ अंक ७ , ३ , १ असे. शुभ दिवस सोमवार , मंगळवार आणि गुरुवार असा आहे. या दिवसांत जर यांनी कोणते शुभ कार्य केले तर त्याचे परिणाम सकारात्मक मिळतात.

तसेच यांचा शुभ रंग गुलाबी , पांढरा आणि चॉकलेटी आहे. शुभ रत्न मुन स्टोन , मोती / पर्ल आहे. हे शुभ रत्न तुम्ही घातले तर ते शुभ मानण्यात आले आहेत. यांना सल्ला असा आहे कि यांनी त्याची संवाद कुशलता अजून चांगली करावी.

या व्यक्तींनी शनिवारी थोडे तेल घेऊन किंवा मोहरीचे तेल असेल तर उत्तमच. त्या तेलात त्यांनी स्वतः चेहरा बघावा आणि ते तेल शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात अर्पण करावे. याचे फळ या डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना उत्तम मिळते.

डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक प्रत्येकाच्या विचारसरणीचा किंवा मताचा पूर्ण आदर करतात. हे लोक इतरांबद्दल कोणताही गैरसमज पाळत नाहीत. डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या आयुष्यात कोणाचेही नुकसान करत नाहीत. अनेकदा या लोकांबद्दल इतरांचे गैरसमज निर्माण होतात.

Leave a Reply