घरापुढे लिंबाचे झाड असेल तर; सावधान..बघा घरात काय काय घडू शकते !

अध्यात्म

झाडात देव असतो, आपण झाडांची पूजा करतो, झाडे बहुउपयोगी असतात, त्यांचं प्रत्येक अवयव आपल्या मदतीस असतो त्यामुळे अनेक दुर्धर आजारांवर यांचा उपयोग होतो. काही झाडे शास्त्रानुसार अशुभ शक्तींसाठी राखीव असतात. त्यामुळे त्यांचं आपल्या सभोवताली असणे अहितकारक मानले जाते.

   

त्यामुळे हिंदू ध’र्म शास्त्र व वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराजवळील परिसरात कोणती झाडे असावीत व नसावीत याचे महत्व सांगितले आहे ते आपण नक्कीच लक्ष्यात घ्यायला हवे. त्यामध्ये लिंबाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. पण हे लिंबुचे झाड एका विशिष्ट ठिकाणी असले तरच जास्त प्रमाणात फायदा होतो. लिंबू हा एक बहुउपयोगी असे फळ आहे, त्याच महत्व अनन्यसाधारण आहे.

शरीरातील घटक व्यवस्थित राहतात, शरीर निरोगी राहते, पण काही वर्षांपूर्वी अशी अफवा पसरली होती की लिंबाचे झाड दारात नसावे कारण त्यामुळे वातावरण दुषित होते, पण ही गोष्ट चुकीची आहे. वास्तुशास्त्र नुसार दारात लिंबाचे झाड असावे. मात्र ते एका विशिष्ट दिशेला असणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्र आपल्या हिताच्या गोष्टी सांगते त्यामुळे त्यात तथ्य आहे. वास्तुशास्त्रनुसार लिंबाचे झाडाविषयी दोन नियम सांगितले आहेत, लिंबाच्या झाडाविषयी , जे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच मध्य भागात हे झाड नसावे, कारण त्यामुळे हे झाड आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

हे वाचा:   विवाहित असूनही नेहमी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात या ५ राशीच्या व्यक्ती..बघा कोणत्या आहेत या ५ राशी.

आपण कल्पना देखील करू शकणार नाही असे नुकसान होईल. यावर उपाय म्हणून त्याच्या भोवती तुळशी वृंदावन लावावे.कारण तुळशीच्या झाडाचे हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. ही झाडे लावताना विषम संकेत लावावीत. याचबरोबर लिंबुचे झाड तुम्हाला अनेक फायदेही देउ शकते. उदा. काही जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात अशा वेळेस हिरव्या रंगाचे लिंबु आपल्या उशाला घेऊन झोपावे.

केवळ 5 दिवसात हे वाईट स्वप्न दूर होण्यास मदत होईल. परत लहान मुलांना जी नजर लागते त्यावर ही लिंबू गुणकारी आहे. आपल्या घराला वाईट बाधा होत नाही.डाग नसलेला लिंबु घेऊन त्याला मधोमध कापुन त्यात काळे तीळ त्यामध्ये भरून काळ्या धाग्याने ते दोन्ही भाग एकत्र करून बांधावे आणि लहान मुला वरून किंवा घरावरून ते 7 वेळ उतरावे आणि घराबाहेर फेकुन द्यावे.

हे वाचा:   घरामध्ये याठिकाणी चुकूनही लावू नका पितरांचे फोटो..जर असे केले तर घरावर संकट येऊ शकते..

तसेच हे झाड आरोग्याच्या दृष्टीने पण फायदे देत असते. आजकाल प्रत्येक जण रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आहे. त्यामध्ये या लिंब्याच्या झाडामुळे व्हिटॅमिन सी वाढवण्यास मदत होते. वास्तुशास्त्रनुसार लिंबाचे झाड हे घराच्या बाहेरील कोणत्याही कोपऱ्यात लावले तरी चालते मात्र घराच्या मुख्य आणि मध्य भागात लावून चालत नाही.

घरी अनेक जण सततचे आजारी पडत असतात त्यांचं आजारपण हटत नाही किंवा बरेच उपचार करून देखील फायदा होत नाही अशा वेळी हे झाड खूप मदत करू शकत. एक लिंबु घेऊन त्यावर काळ्या शाईने 3,0,7 हे अंक लिहायचे आहेत. आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा हे फिरवायचे आहे ते पण उलट दिशेने यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यात फरक पडत जातो हे नक्की जाणवेल.

त्यामुळे हे झाड शुभ की अशुभ ते विचार करण्यापेक्षा योग्य दिशा पाहूनच हे झाड लावायला हवे. तरच पुढे जाऊन त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत. काही गोष्टी अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर शास्त्र म्हणून कराव्यात आपलाच लाभ होतो.

Leave a Reply