नमस्कार, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील सं-कटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे.
हे भारतातील शेकडो वर्ष जुने मंदिर आहे. तेथे स्थित भगवान बालाजीच्या मूर्तीच्या देखरेखीसाठी खास व्यवस्था देखील केली आहे. याशिवाय हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मंदिराचे फिक्स डिपॉझिटमध्ये इतके पैसे आहेत की दरवर्षी 800 कोटींपेक्षा जास्त पैसे केवळ या मंदिराला व्याजातून मिळत असतात.
हे संपूर्ण जगातील सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे, ज्याचे नाव भारतातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे. भारतामध्ये दक्षिण भारतात अशी शेकडो मंदिरे आहेत, तरी जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान विष्णूचा अवतार, वेंकटेश्वर महाराजांची पूजा केली जाते.
या मंदिराची सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या मंदिराच्या ग र्भ गृहात स्थापित केलेली मूर्ती मानवांनी बनवलेली नसून, देव स्वत: इथे बसलेले आहे,जरी ही मूर्ती दगडाने बनलेली असली तरी, ती जिवंत मूर्ती असल्याप्रमाणे दिसते. त्यामुळे मंदिराचे पुजारी भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीवर चंदनचा लेप लावतात.
तसेच गेल्या दीड हजार वर्षांपासून या मूर्तीचे केस आजही मूर्तीप्रमाणेच स्वच्छ आणि मऊ आहेत. भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीचे केस कधीच गुंतागुंत होत नाहीत. तिरुपती बालाजी मंदिराला भेट देणारे लोक आणि तेथील पुजारी म्हणतात की ,परमेश्वराच्या मूर्तीवर सर्व वेळ समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो.
याशिवाय या मंदिराला सर्व काही नवस भगवान व्यंकटेश पूर्ण करत असतात. एकदा नवस पूर्ण झाल्यावर तिथे जाणारे भक्त केस दान देऊन श्रद्धा दर्शवतात. दररोज 20,000 भक्त आपले केस तिरुपती बालाजी मंदिरात दान करतात. या मंदिराकडे इतका पैसा आहे की, दान केलेले सोने आणि चांदी मोजण्यासाठी 50 हून अधिक कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरमहा 200 ते 300 कोटींची कमाई या मंदिरात भाविकांनी केलेल्या अर्पणांमुळे होते. हे पैसे दानधर्म आणि समाज सेवेसाठी वापरले जातात.
या मंदिराला सर्वात मोठे उद्योगपती ते राजकारणी देखील येथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात,आणि गुप्त देणग्यांमध्ये सोने-चांदी अर्पण करून जातात. या मंदिराची भारताच्या अनेक बँकांमध्ये 12000 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे, यामुळे दरवर्षी सुमारे 800 कोटींपेक्षा जास्त व्याज स्वरूपात मंदिराच उत्पन्न आहे. तिरुपती बालाजीच्या आईने बालपणातच त्याला मा र हा ण केली होती आणि मा र हा णी मुळे त्यांना प्रत्येक शुक्रवारी चंदनचा लेप लावला जातो आणि कालांतराने ही एक परंपरा बनली आहे.
ही मूर्ती एका खास प्रकारच्या गुळगुळीत दगडाने बनलेली आहे. परमेश्वराला आराम करण्यासाठी मंदिरात संपूर्ण वातावरण अगदी थंड ठेवले जाते. तरीपण असे असूनही, भगवान तिरुपती बालाजी यांना खूप गरम वाटते, ज्यामुळे त्यांच्या अंगावर घामाचे थेंब पहावयास मिळतात. मंदिराचे पुजारी वेळोवेळी परमेश्वराच्या शरीरावरचा घाम पुसत असतात.
याचबरोबर या मंदिरात भगवान विष्णूना प्रिय असलेली तुळशीची पानेही रोज पूजेमध्ये अर्पण केली जातात. तिरुपती बालाजी मंदिराच्या गुप्त स्वयंपाकघरात 3 लाखाहून अधिक तुपाचे लाडू बनविले जातात. तिरुपती बालाजीच्या मंदिरापासून 23 कि.मी. अंतरावर असे एक गाव आहे ,जेथे जाड लोकांवर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय इथले लोक बरेच नियम आणि संयम पाळून जगत असतात. भगवान तिरुपती बालाजींना अर्पण करण्यासाठी फळ, फुले, दूध, दही आणि तूप इत्यादी सर्व पदार्थ इथले लोक स्वतः बनवतात.
या मंदिराबद्दल आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराच्या ग र्भ गृहात एक दिवा शेकडो वर्षांपासून सतत जळत आहे. जेव्हा आपण तिरुपती बालाजी मंदिरात पाहिल्यास मूर्ती ग र्भ गृहात मध्यभागी दिसते, परंतु ग र्भ गृहातून बाहेर आल्यावर आणि मूर्ती पाहताच असे वाटते की, ही मूर्ती उजव्या बाजूला उभी राहिली आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.