याच ठिकाणी माता सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती..येथे आहे हे ठिकाण; हा आहे पाताळलोकचा रस्ता..आजही या ठिकाणी होते..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर नगर जिल्हा स्थित एक शहर आहे. हे गंगा नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. हिंदूंसाठी या पवित्र आश्रमाचे मोठे महत्त्व आहे. हीच ती जागा आहे जिथे संत वाल्मीकि ऋषींनी रामायण लिहिले होते. तसेच या सृष्टीच्या निर्माणापूर्वी भगवान ब्रम्हा येथे तपस्या करण्यासाठी बसले होते.

   

तसेच या ठिकाणी भगवान श्री रामाने माता सीतेचा त्याग केला होता तेव्हा तीसुद्धा इथेच राहू लागली. या आश्रमात माता सीताने लव कुश यांना जन्म दिला होता. या साऱ्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत असे सांगितले जाते.. भारताच्या कानपुर शहरात एक बिठुर नावाचे हे ठिकाण आहे. हे ठिकाणी अनेक पौराणिक कथांशी निगडित आहे असे सांगितले जाते. येथेच रामायण लिहिले गेले.

मंदिराच्या पुजारीच्या सांगण्यानुसार सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी येथे माता सीता आली होती. लव कुशने याठिकाणी महर्षी वाल्मिकी यांच्याकडून विद्या प्राप्त केली होती. या ठिकाणी सीतामातेची जेवणघरातील अनेक भांडी आजही सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत. ती आपल्याला पाहावयास मिळतात. लव आणि कुश यांनी या तलावात स्नान केल होत.

हे वाचा:   प्रत्येक मुलीला या ७ गोष्टी हव्याहव्याशा वाटत असतात.. त्यांची ही गोष्ट तर एक पुरुषच पूर्ण करू शकतो..बघा मुलींना काय पाहिजे असते

या ठिकाणी एक विहीर आहे तिचे पाणी आजवर कधीच आटले नाही. तसेच या ठिकाणी लव-कुशने घोडे चालविण्याचे शिक्षन घेतले होती. तसेच ते दोघे ज्या ठिकाणी विद्या प्राप्त करत होते ते वृक्ष आजही तिथे आहेत. एक घोडे घ्यायला एकदा भगवान हनुमान येथे आले होते. तर त्याच्याशी लव कुशने यु ध्द करून त्यांना पराजित करून बंदी बनवले होते. आजही ते बंदी घालण्यात आलेल ठिकाण या बिठुर मध्ये पाहायला मिळते.

हनुमान नंतर ते घोडे चो-रण्यासाठी आलेल्या भगवान लक्ष्मण यांनाही येथे बंदी बनवण्यात आले होते. मग तेव्हा लक्ष्मण आणि हनुमान यांची काही वार्ता आली नसल्याने स्वतः भगवान श्री राम येथे आले होते. मग यु-ध्दात त्याना समजले की हे लव आणि कुश हे त्यांचेच पुत्र आहेत. त्यानंतर माता सीता आणि भगवान श्री राम यांची पवित्र भेट याचं ठिकाणी झाली होती, असे पुराणात सांगितले आहे.

हे वाचा:   या आजारामुळे वर्षातून ३०० दिवस झोपून असतो हा माणूस; स्थानिक लोक म्हणतात कुंभकरण.!

तेव्हा भगवान रामानी जेव्हा माता सीता यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता सीता धरतीमध्ये सामावून गेली होती. आजही त्या ठिकानाची पुजा केली जाते. भगवान ब्रह्मा यांनी यज्ञ करून येथुन सृष्टीची स्थापना केली होती. असा प्रकारे बिठुर हे एक पौराणिक ठिकाणाबरोबर एक रहस्यमय प्राकृतिक ठिकाण म्हणून ही प्रसिद्ध आहे.

 

Leave a Reply