पूजा करा नाहीतर करू नका, फक्त या 4 सवयी लावा; गरिबी कधीच जवळ येणार नाही ! श्री कृष्ण उपदेश..

अध्यात्म

आपले रोजचे वर्तन जसे असते आपण सारखे जे करतो त्याला आपली सवय म्हटली जाते. काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी वाईट असतात. आपल्या सवयीमुळे आपले आ-रोग्य, वर्तन, व्यवहार, आचरण, राहणीमान, खाणे- पिणे यावर तर प्रभाव पडतोच त्याबरोबर आपले भाग्यही या सवयीमुळे प्रभावित होत असते.

   

जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर निश्चितच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनात ही या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. या उलट जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्या सवयीचा आपल्या जीवनावर नकारात्मक व वाईट परिणाम दिसून येतो. आपण नेहमी आपल्या इष्ट देवांचे मनोभावे पूजन व ध्यान करीत असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण भगवंतांचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही.

परंतु आपल्याला जर भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्या वर्तनात थोडा बदल करावा लागेल व काही सवयी आत्मसात करून आपल्या जीवनात उतरवाव्या लागतील. असे करून सहजच आपण भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंतांना प्रसन्न करू शकतो आणि जर भगवंतांची कृपा असेल तर आपल्या जीवनात सुख, वैभव, आनंद व धन संपत्ती आपोआप येऊ लागते.

तसेच आपल्या कुटुंबातील सर्व कष्ट दूर होऊ लागतात. आज आपण प्रभू श्री कृष्णांनी सांगितलेल्या 4 अश्या सवयी बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या जीवनात उतरवून भगवंतांची कृपा सहज प्राप्त करू शकतो. तर जाणून घेऊ या त्या कोण कोणत्या 4 सवयी आहेत. यातील सर्वात पहिली बाब म्हणजे भगवंतांपेक्षा मोठे कोणीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्ट देवांचे नामस्मरण ध्यान करावे.

हे वाचा:   स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या 2 वस्तू; घरात कायम लक्ष्मी नांदू लागेल.!

आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवाची कृपा असणे फार आवश्यक आहे आपल्याला दररोज भगवंतांचे पूजन करणे शक्य नसेल तर काहीही हरकत नाही परंतु सकाळी आपल्या कुलदेवांचे स्मरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते.

आपल्याला दररोज भगवंतांचे पूजन करणे शक्य नसेल तर ठीक आहे परंतु आढवड्यातून एकदा तरी ज्या दिवशी आपल्या कुलदेवा संबंधित वार असेल त्या दिवशी भगवंतांचे पूजन जरूर करावे व त्यांचे नामस्मरण करावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवांना नमस्कार जरूर करावा.

सकाळ संध्याकाळ देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा जरूर लावावा या सवयीमुळे आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत स्नान होत नाही तो पर्यंत स्वयंपाक घरात प्रवेश करू नये परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य नाही म्हणून निधन सकाळी उठल्यानंतर तोंड हात पाय स्वच्छ धुवून मगच स्वयंपाक घरात प्रवेश करावा.

तसेच गॅसवर काही बनवण्यापूर्वी अग्नी देवांना व गॅसला नमस्कार करावा या सवयीमुळे अग्नी देवाबरोबर देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याबरोबरच अन्नाचा कधीही अपमान करू नये. पुढील गोष्ट म्हणजे काही अश्या सवयी आहेत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवले तर भगवंतांची कृपा तर आपल्यावर होतेच त्या शिवाय आपले मनही प्रसन्न व समाधान राहते आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

हे वाचा:   तुम्ही देखील रात्री बाहेर कपडे वाळवत असाल तर, पहा आपल्यासोबत किती भयानक घडू शकते ! जाणून घ्या

कधीही कोणालाही वाईट वाटेल त्यांच्या मनाला लागेल असे अपशब्द बोलू नये तसेच कोणाचा अपमान होईल अशी वाक्य ही तोंडातून काढू नयेत. आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुःखवु नये त्यांच्या बद्दल अपशब्द बोलू नये घरातील व इतर स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा. गरजू व गरीब व्यक्तींना शक्य होईल ती मदत करावी कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रा स देऊ नये आपल्या दारावर जर एखादा मुका प्राणी आला तर त्याला काहीतरी खायला जरूर द्यावे.

जर आपण ही सवय आत्मसात केली तर भगवंतांची कृपा आपल्यावर कायम राहील. आपण रस्त्यावर चालत असताना नेहमी या गोष्टीकडे लक्ष द्यावे की आपल्या पायाखाली किडे, मुंग्या येऊन मरणार नाहीत घराबाहेर पडताना भगवंतांचे नामस्मरण करूनच निघावे आणि चालत असताना जमिनीकडे बघूनच चालावे ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ते व्यक्ती भगवंतांचे खूप आवडते असतात आणि त्यांच्यावर भगवंतांची कृपा कायम राहते भगवंतांच्या कृपा आशीर्वादामुळे त्या व्यक्तींना जीवनात कायम सुख, समृद्धी, आनंद, धन मिळत राहते व ते समाधानाने व आनंदाने आपले जीवन व्यथित करतात.

 

Leave a Reply