शनिवारी काळ्या कुत्र्याला ही गोष्ट खाऊ घातल्याने होतात शनिदेव प्रसन्न..साडेसाती, घरातील आजारपण, कर्जापासून सुटका होवून लक्ष्मी देवीची कृपा होते..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

   

मित्रांनो शनिवार हा शनिदेवाला समर्पित केलेला वार आहे. या शनिवारी केलेले छोटे छोटे उपाय शनिदेवाला प्रसन्न करतात. शनिदेवाचे वाहन आहे काळा कुत्रा. म्हणजेच काळ्या रंगाचा कुत्रा.

म्हणून शनिवारी कोणत्याही काळ्या रंगाच्या कुत्र्याला हि एक वस्तू खाऊ घातली तर शनिदेव प्रसन्न होतात. आपल्या कुंडलीमध्ये कधीकधी काही ग्रह अशुभ स्थानी असतात.

हे अशुभ स्थायी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या स म स्या निर्माण करतात. विशेषतः शनी आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थानी असेल तर घरात वारंवार आजारपण येणे, नोकरी उद्योग न चालणे किंवा हळूहळू घरात गरिबी येणे या प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

काळ्या कुत्र्याला खाऊ घातलेली ही छोटीशी वस्तू आपल्या कुंडलीतील शनीची गती वाढवतो आणि लवकरात लवकर शनीची साडेसाती पासून आपणास मुक्ती मिळते.

हे वाचा:   बँकेचे पासबुक गुपचूप याठिकाणी ठेवा...पैसा वाढतच जाईल..! वास्तू धनलाभ उपाय

घरातील आजारपण दूर होते, घरात सुख शांती लाभते. चला तर जाणून घेवूयात शनिवारच्या दिवशी आपण या काळ्या रंगाच्या कुत्र्याला कोणती गोष्ट खावू घालावी.

मित्रांनो, शनिवारच्या दिवशी पहिली भाकरी किंवा पहिली चपाती जी आपल्या किचन मध्ये तयार होते ती आपण गोमातेसाठी बाजूला काढून ठेवावी आणि शेवटची जी चपाती किंवा भाकरी बनेल ती आपण काळ्या रंगाच्या कुत्र्याला खावू घालावी.

जेव्हा कुत्रा ही भाकरी किंवा चपाती खावू लागेल तेव्हा एक छोटासा मंत्र आम्ही तुम्हाला सांगत आहोत या मंत्राचा यावेळी अवश्य जप करा. मंत्र अगदी साधा सोपा आहे. ओम भ्रं कालभैरवाय  नमः

या मंत्राचा जितक्या वेळी आपणास जप करता येईल तितका वेळ आपण याचा यावेळी जप करावा आणि घरी परत यावे.

हे वाचा:   जर तुमच्या मैत्रीणीच्या ओठांवर अशाप्रकारचा तीळ असेल तर जाणून घ्या तिच्याबद्दल या गुप्त गोष्टी.!

जर प्रत्येक शनिवारी आपण हा उपाय केला तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील शनीची जी पिडा आहे म्हणजेच दोष आहे, हे दोष नक्की दूर होतील. कुत्र्यास चपाती भाकरी खावू घालून परत येताना,

आपण त्या कुत्र्यास मनोभावे हाथ जोडून परत यावे. आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा बरसावी.

तर या शनिवारी वरील हा उपाय नक्की करून पहा आणि आपला देखील श्री शनी देवावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “जय श्री शनिदेव” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये

 

 

Leave a Reply