“माझं खरच खूप मनापासून प्रेम आहे ग त्याच्यावर “! उर्वी रडून रडून विशाखा समोर आपल मन मोकळ करत होती. अग पण ही तुझी बाजू झाली, पण त्याच काय? त्याचही तुझ्यावर तेवढच प्रेम आहे का? याचा पण विचार कर न, उर्वी आणि विशाखा दोघी कॉलेज पासूनच्या मैत्रिणी आता एकाच ऑफिसमध्ये काम करतात तेव्हापासूनची दोघींची अगदी घट्ट मैत्री.
सगळी सुखं -दुःख एकमेकाशी शेअर करत असत. ऑफिसमध्ये लंच ब्रेक मध्ये त्यादोघी गप्पा मारत असतात तेव्हा उर्वी त्याच्याविषयी सांगू लागली. उमेश उर्विच्याच ऑफिस मध्ये काम करणार हुशार, कर्तबगार होतकरू मुलगा. त्याचे आणि उर्वीचे बऱ्याचवेळा बोलणे होत असे. दोघेही एकाच प्रोजेक्ट मध्ये काम करत होते. उमेश तो प्रोजेक्ट लीड करत होता. त्यामुळे मिटींग्ज, कॉल, डिसिजन यासाठी दोघे एकत्र काम करत असत.
जेवण एकत्र, दुपारचा चहा एकत्र यामुळे दोघातली मैत्री वाढू लागली. ऑफिस मध्ये येणे जाणे एकत्र होऊ लागले. दोघांची घरे तशी लांब होती मात्र उमेश उर्वीला पिक करायला तिच्या घरापर्यंत रोज जात असे. हळूहळू ऑफिस कामाशिवाय दोघांचे बोलणे वाढू लागले, त्यातून दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्याच मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागले. निदान उर्विसाठी तरी हे प्रेमच होते. त्यामुळे रोजचा दिवस एकमेकांशिवाय जातच नसे.
रोज ऑफिस शिवाय बाहेर भेटणे, भेट वस्तू देणे, मुव्हीज अश्या गोष्टीना उधाण येऊ लागले. सतत फोन, मेसज, सो शल मि डीयावर एकमेकांशी होणारा संवाद इ.वाढू लागले. उर्वी उमेश वर मनापासून प्रेम करत होती, त्याच्यासाठी वाटे ते करायचं तिची तयारी होती. फोन का आला नाही, मेसेजला रिप्लाय का दिला नाही याचा सतत तिच्या डोक्यात चालू राहिला. त्याच्यासाठी नवीन काहीतरी पदार्थ करून घेणे, त्याच्या आवडीच काहीतरी रोज बनवून नेणे हा तर आता तिचा नित्यक्रमच झाला होता.
उर्वीच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आली होती. तिने उर्वीला त्याबद्दल विचारले देखील. उर्वीने आपल्या प्रेमाची कबुली आईजवळ दिली होती. उर्वी मनापासून उमेशवर प्रेम करत होती. उमेश अतिशय साधा आणि सरळ मुलगा होता. त्याला आपण छान दिसावे, चांगले कपडे घातले पाहिजे याची विशेष आवड नव्हती. त्याने नीट राहावे छान दिसावे हा उर्वीचा अट्टाहास होता.
त्यामुळे त्याच्यासाठी कपडे खरेदी करणे, परफ्युम्स, घड्याळ बेल्ट अश्या त्याचे व्यक्तिमत्त्व खुलवणाऱ्या वस्तू ती नेहमीच त्याला घेऊन देत असायची. दोनच महिन्यात तिने उमेशचा लूक पूर्ण बदलून टाकला होता. पूर्वीचा साधा उमेश आता अधिकच देखणं आणि सुंदर दिसत असे. एकदा दोघे महाबळेश्वर ला गेले होते. एकमेकांच्या सहवासात, प्रेमात, डोळ्यात डोळे घालून एकमेकांचा हवाहवासा स्पर्श दोघे अनुभवत होते.
त्या धुंद वातावरणातून बाहेर पडावे असे दोघानाही वाटत नव्हते. त्यादिवशी त्यांनी तिथे राहायच ठरवलं. नि तस घरी देखील कळवलं. उर्वीच्या आईने थोड्या काळजीनेच तीला राहायला परवानगी दिली. तिथल्या वातावरणाची वेगळीच न शा दोघानाही चढली होती. तिथल्या एका छान निसर्गरम्य हॉटेलमध्ये दोघे राहिले. रात्री जेवण करून फिरून आले. प्रतीकच्या मनात आज वेगळाच प्लान होता. तो सतत उर्वीच्या केसातून हात फिरवत तिला जवळ घेऊन बसला होता.
रात्री फिरून येताना मस्त आईसक्रिम खाल्ले एकाच रूम मध्ये दोघेही राहिले. दोघांनी एक्स्ट्रा बेड लाऊन घेतला होता. पण अचानक उमेश उर्वीच्या जास्तच जवळ आला उर्वी त्याच्याशी फ्युचर प्लान बद्दल बोलू लागली. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिच्या जवळ जाऊ लागला आणि दिवसभरातील दोघांच्या सहवासाने दोघांमध्येही आकर्षण वाढत होते.
उर्वी उमेशला समजावत होती हे सगळ आता करण योग्य नाही. पण दोघेही वेगळ्याच मूड मध्ये होते. शेवटी दोघांचाही तोल गेला. जे दोघांच्यामध्ये घडायला नको होते तेच रात्री घडले, आणि त्यांनी त्या रात्री काम जी वनाचा मनसोक्त आनंद घेतला, पण सकाळी जेव्हा उर्वीला जाग आली तेव्हा तिला खूप वाईट वाटत होते. उमेश मात्र एकदम शांत होता, जे झाल ते योग्यच होत असा तिला समजावत राहिला. त्याला सगळ्या गोष्टींचा आनद मिळाला होता.
परत आल्यापासून उर्वी खूप निराश होती. आपल्या मैत्रिणीला भेटन मात्र तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या. विशाखा तिला समजावत होती, आधार देत होती. झाल्या प्रकाराचा उमेश्वर मात्र काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही तो तिच्याशी सारखाच प्रेमाने वागत राहिला. पुन्हा सगळ्या गोष्टी हळूहळू सुरळीत होऊ लागल्या.
आता मात्र उर्वी लग्नाचा हत्त करू लागली. उमेश हि हो म्हणून सांगत राहिला. बाहेर जाणे मर्यादा ओलांडणे आता नेहमीचेच होऊ लागले. लग्नाचा विषय मात्र उमेश नेहमीच टाळू लागला. एकदा तर त्याने स्पष्टच सांगितले कि त्याला आताच लग्नाचा विचार करायचा नाहीये. आता करिअर महत्त्वाचे आहे. पुढच्या महिन्यात तो अमेरिकाला निघून गेला. इकडे उर्वी मात्र त्याच्या आठवणीत आला दिवस शांतपणे घालवत राहली. त्यांचे पुढे काही होईल का याचाच विचारात आपली स्वप्न मातीमोल होत असताना पाहत राहीली