या 4 चुका करणारा माणूस, आयुष्यभर गरीब राहतो..म्हणून आजपासूनच या 4 चुका टाळा आणि स्वताची प्रगती करा..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, तुम्ही याचा कधी विचार केलाय का की मध्यमवर्गीय माणूस हा नेहमी गरीबच का राहतो? याउलट श्रीमंत माणूस हा श्रीमंतच होत जातो. याला अशी चार कारणे आहेत ज्यामुळे माणूस आहे त्या अवस्थेत राहतो, प्रगती करू शकत नाही. आपण आज तीच चार कारणे कोणती हे जाणून घेणार आहोत.

   

अशा काही सवयी असतात किंवा असे काही विचार असतात जे सतत पुढं जाण्यापासून तुम्हाला थांबवत असतात. आपण प्रत्येकानेच सुखी व श्रीमंत रहावे आणि आपल्या देशाची प्रगती होत राहावी यासाठी आपण अनावधानाने त्या चार चूक करत तर नाहीये ना. याचा विचार करा.

१. फक्त बचतीचा विचार करणे:- बचत ही काही वाईट गोष्ट नाही पण नेहमीच आहे त्यातून बचतीचा मार्ग शोधणे त्यात समाधानी राहायला भाग पाडते, त्यामुळे तुम्ही इतर उत्पन्न मिळवणारे स्रोत काय असू शकतील याचा विचार करण नकळत थांबवता.

त्यामुळे काही लोकांचे पाच वर्षांपूर्वीचे उत्पन्न आणि सध्याचे उत्पन्न यात फरकच नसतो याउलट सतत नवीन उत्पन्न स्रोत शोधणाऱ्या तसेच कमी वेळेत जास्त पैसे कमावणारे लोक लवकर श्रीमंत होतात.

हे वाचा:   महिलांना नारळ का फोडू देत नाहीत; का बरं ? जर महिलेने नारळ फोडले तर काय घडते..यामागील रहस्य जाणून घ्या..

२. नेहमी लायाबिलिटी वरती खर्च करणे:- सामान्य मध्यमवर्गीय माणसं नेहमी लायाबिलिटी वरती खर्च करताना दिसून येतात. लायाबिलिटी म्हणजे ज्या गोष्टी खरेदी करून पुन्हा खर्चात टाकतात जस की महागडे मोबाईल, महागडे चप्पल व कपडे, कार जिचा सर्व खर्च पुन्हा तिच्यासोबत आला जी भविष्यात तुम्हाला काही उत्पन्न मिळवून देत नाही.

याउलट जर तुम्ही असेट म्हणजेच अशा ठिकाणी गुंतवणूक कराल जी भविष्यात खूप मोठा परतावा मिळवून देईल जसे की जमीन, सोने, एखाद्या उत्तम कंपनीचे स्टॉक इ. ज्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहील. असं नाही की तुम्ही खर्च करू नये पण असेट जेंव्हा जास्त असतील तेव्हा त्या गोष्टींचा विचार करा.

3. स्वतःच्या प्रगतीवर खर्च न करणे:- मध्यमवर्गीय माणसे स्वतःच्या प्रगतीवर खर्च करत नाहीत. सर्वात मोठी व महत्वाची संपत्ती जी प्रत्येकाकडे आहे ती म्हणजे तुमची बुद्धिमत्ता होय. श्रीमंत माणसे यावरती खर्च करतात म्हणजे त्यांचे काम वाढवतात, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतात.

हे वाचा:   जाणून घ्या कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव…जीवन, भविष्य, करियर कसे असते..तसेच या राशींचे लोक म्हणजे लाखात एक असतात..

सेमिनार्स, ट्रेनिंग प्रोग्राम, लॉजिकल थिंकिंग यासारख्या गोष्टींवर वेळ आणि पैसे दोन्ही खर्च करतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते. याउलट सामान्य माणूस तेच तेच काम करून उत्पन्न स्थिर ठेवतो. शिकण्याची गती वाढवली की उत्पनाची गती आपोआप वाढते.

४. वेळ वाया घालवणे:- आपल्याला मिळालेला वेळ हा सत्कारणी लावणं हाच काय तो उत्तम मार्ग श्रीमंत होण्याचा. श्रीमंत लोक वेळेची कदर करतात व वेळ वाया घालवत नाहीत तर सामान्य लोक मोकळ्या वेळेत कॉमेडी शो, व्हाट्सएपच्या विनोदी गप्पा किंवा इतरांविषयी बोलण्यात वेळ घालवतात ज्यामध्ये त्यांना कळत नाही की ते किती वेळ वाया घालवतात, मनोरंजन असावे परंतु त्याला एक सीमा असावी ज्यामुळे आपल्या प्रगतीला बाधा येणार नाही.

वरील चार चूका जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा व स्वतः स्वतःच्या उत्पन्न वाढीच्या कार्यात मग्न रहा..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply