या दिवशी पैसे कुणालाही उधार देऊ नये परत मिळणार नाहीत..कर्ज लोन कधी घ्यावे..जाणून घ्या योग्य माहिती..

अध्यात्म

एखाद्या मित्राला नातेवाईकाला तुम्ही कधीना कधी तरी पैसे उसने दिले असतील. आणि मग अशी वेळ कधी कधी येते की हे उसने किंवा उधार दिलेले पैसे हा समोरचा व्यक्ती परत करण्याचा नावच घेत नाही. काही वर्षांनी आपण ते पैसे बुडीत खात्यात जमा करतो की आता हे पैसे कधीही परत येणार नाहीत असे मानतो.

   

असे प्रसंग टाळण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की पैसे उधार कधी द्यायला हवेत आणि कधी द्यायला नकोत हेच आज आपण माहीत घेणार आहे की असे कोणते वार आहेत असे कोणते दिवस आहेत की त्या दिवशी आपण चुकूनही एखाद्याला पैसे उधार देऊ नयेत तसेच उधार घेऊ नयेत या बद्दल सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत.

बरेच जण लोन काढतात कर्ज काढतात मग हे कर्ज फेडन शक्य होत नाही या बाबतीत सुद्धा आपल्या आज माहिती घेणार आहे. पहिला दिवस सोमवार पैश्याची देवाणघेवाण करण्यासाठी व्यवहार करण्यासाठी सोमवारचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो कारण सोमवारच्या दिवशी तुम्ही जर एखाद्याला पैसे उधार दिले तर हे पैसे अगदी वेळेवर आपल्याला परत मिळतात त्यासाठी जास्त तगादा लावण्याची गरज पडत नाही.

आणि ज्यांना पण पैसे दिलेले असतात तो व्यक्ती सुद्धा अगदी सहज रित्या हे पैसे आपल्याला परत करतो आणि म्हणून पैसे देण्यासाठी सोमवारचा दिवस अतिशय उत्तम मान्यत येतो. या उलट जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी एखाद्या कडून उधारी वर पैसे घ्यायचे असतील किंवा लोन काढायच असेल तर त्यासाठी सुद्धा सोमवारचा दिवस आतिशय शुभ मानले जाते.

कारण या दिवशीचे पैसे आपण लोन वर घेऊ किंवा व्याजावर घेऊ ते पैसे आपल्याला सहज परत करता येतात म्हणून सोमवार अतिशय उत्तम दिवस आहे पैश्याचा व्यवहार करण्यासाठी. दुसरा दिवस मंगळवार एखाद्याकडून मंगळवारच्या दिवशी चुकूनही उधारीवर पैसे घेऊ नका कारण असे घेतलेले पैसे हे सहजा सहजी फेडता येत नाहीत म्हणून मंगळवारी पैसे उधार घेऊ नका.

हे वाचा:   जर घरात आला हा पक्षी तर तुम्ही मालामाल व्हाल ! हे पक्षी घरात येणे असतात शुभ संकेत..समजा तुमचे दिवस सुरु झाले..

जर आपण कोणाकडून पैसे उधार घेतले असतील आणि ते जर परत करायचे असतील तर हे पैसे परत करण्यासाठी हा मंगळवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि तुमचे लोनचे हप्ते सुद्धा लवकर फिटतात. तिसरा दिवस बुधवार या दिवशी चुकूनही कोणाला उधार देऊ नका या दिवशी दिलेले पैसे हे बुडीत खात्यात जमा होतात बुधवार हा दिवस बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो आणि बुध ग्रह हा न पुं स क ग्रह आहे म्हणून या दिवशी केलेला व्यवहार हा असफल ठरतो.

गुरुवारचा दिवस सोमवार सारखाच शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही पैसे देऊ ही शकता पैसे घेऊ सुद्धा शकता गुरु ग्रहाचा प्राबल्य या दिवसावर दिसून येतो आणि म्हणून या दिवशी व्यवहार करण्यासाठी अतिशय चांगला वार आहे. गुरुवारच्या दिवशी दिलेले पैसे अगदी वेळेत परत येतात ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत तो सुद्धा अगदी वेळेवर तुमचे पैसे परत करतो आणि जर या दिवशी कोणाकडून पैसे उधार किंवा लोन घेतलात तर हे पैसे सुद्धा अगदी सहजपणे समोरच्या व्यक्तीला परत करतात.

पुढचा वार शुक्रवार हा दिवस थोडासा मध्यम दिवस आहे ज्यांना असे व्यवहार करायचे आहेत की ज्यामध्ये विश्वास हा फार महत्वाचा आहे जर तुम्हाला जमीन घ्यायची आहे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे तर शुक्रवारचा दिवस अतिशय उत्तम मान्यत येतो कारण या दिवशी केलेले व्यवहार हे विश्वासपात्र असतात म्हणजे यात फसवणुकीची कुठेही शक्यता निर्माण होत नाही.

हे वाचा:   या दिशेला तोंड करून झोपल्याने होतो "अकाल मृत्यु" ! वास्तूशास्त्र नुसार झोपण्याची योग्य दिशा जाणून घ्या..

शनिवार हा दिवस शनी या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की शनी हा कामे प्रलंबित ठेवणारा ग्रह आहे म्हणजे शनिवारी जे काही कामे आपण करू हे काम दीर्घकाळ तशीच राहतात कामे पूर्ण होत नाहीत. तुम्ही जर या दिवशी एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तर ते तुम्हाला परत तर मिळतील मात्र इतक्या उशिरा मिळतील तोपर्यंत त्या पैश्याच मूल्यच राहणार नाही.

म्हणजे तुम्ही आज दिलेले पैसे एका वर्षाच्या वाद्याने दिले असतील तर 7 ते 8 वर्ष तरी तुम्हाला हे पैसे परत मिळण्यासाठी वाट पहावी लागू शकते. यामुळे शनिवारी पैसे देऊ नयेत किंवा पैसे सुद्धा घेऊ नये कारण तुम्हाला ते परत करण्यासाठी तितकेच कष्ट लागतील.

शेवटचा दिवस रविवार हा रवी म्हणजे सुर्यदेवाच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे हा अग्निशी संबंधित ग्रह आहे या दिवशी जर आपणास पैसे द्यायचे असेल किंवा घ्यायचे असतील तर छोट्या रक्कमेचा व्यवहार करा खूप मोठी रक्कम किंवा खूप मोठा व्यवहार या दिवशी करण्यासारखा नसतो अगदी लहान रक्कमा आहेत असे व्यवहार आपण करू शकतो मात्र मोठ्या रक्कमचे व्यवहार या दिवशी करू नका त्या मध्ये धो का सं भ व तो असे पैसे लवकर मिळण्याची शक्यता फार कमी असते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply