देव या 5 माणसांना कधीच पावत नाही तुम्ही नाक रगडा किंवा लोळण घाला प्रसन्न होत नाही..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. मात्र लक्षात घ्या काही लोक असे असतात की ज्यांनी किती जरी देव देव केलं किती जरी उपाय केले नाक रगडल तरी देव त्यांना प्रसन्न होत नाहीत. काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांनी देवाचं नामस्मरण केलं तर सुद्धा देव प्रसन्न होतो.

मात्र काही लोक इतके अभागी असतात कारण त्यांचे कर्म असे असतात की ज्यामुळे त्यांना परमेश्वर प्रसन्न होत नाही. असे हे 5 लोक कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. यात पहिली गोष्ट जे लोक दुसऱ्याचे वाईट चिंततात दुसऱ्याच आहित व्हाव अस ज्यांना वाटतं. जी लोक फक्त स्वतःच्या भल्याच विचार करतात.

आशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाहीत. आपण नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा. दुसऱ्यांवर जळायची प्रवृत्ती आपली नसावी.
असे लोक की जे आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात जे त्यांचा छळ करतात. आशा लोकांना परमेश्वर कधीही माफ करत नाही. कारण आई-वडिलांमध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो.

हे वाचा:   स्वामी सांगतात ज्या घरात अश्या स्त्रिया असतात त्या घरात भिकारी सुद्धा राजा बनतो..

ज्यांनी आपल्याला लहानाच मोठं केलं आशा आई-वडिलांना जे लोक छळतात आशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. तसेच आशा लोकांच्या घरी पैसा धन एक ना एक दिवशी संपुष्टात येतो. ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही आशा ठिकाणी ईश्वराचा वास रहात नाही. ज्या घरामध्ये स्त्रियांना मान मिळतो आशा ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते.

ज्या घरात स्त्रियांचा नेहमी आपमान केला जातो छळ केला जातो मग ही स्त्री तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी, सून असुद्या कोणत्याही रुपात जेव्हा स्त्रियांचा छळ होतो. त्यावेळी त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रगट होते आणि लक्ष्मी त्या घरातून निघून जाते. ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो. अन्न हे पूर्णब्रह्म अस आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे.

हे वाचा:   जेव्हा पोळी खाऊ घालायला गाय नसेल तेव्हा काय करावे..करा हा साधा उपाय ! ३३ कोटी देवांचा मिळेल आशीर्वाद..

आणि म्हणून अन्न योग्य प्रमाणातच शिजवावं आणि खाताना सुद्धा अन्न आपल्या ताटात शिल्लक राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी. जे लोक अन्नाचा अपमान करतात किंवा इतकं अन्न शिजवलं जातं की ते नंतर वाया जातं. आशा घरामध्ये एक ना एक दिवस दारिद्र्य आल्या शिवाय राहत नाही.

शेवटची गोष्ट जर आपण इमानदारीची साथ सोडून म्हणजेच जर आपन न्यायाची साथ सोडून अन्यायाची साथ देत असाल. तसेच गरिबावर आपण अत्याचार करत असाल किंवा एखादा अपंग व्यक्ती आहे त्याचा अपंगत्वाची खिल्ली उडवत असाल तर ही अत्यंत निंदनीय प्रकारची कृत्य असतात. याची शिक्षा तुम्हाला एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या रुपात ईश्वर नक्की देत असतो. म्हणून ही जी 5 प्रकारची लोक सांगितली आहेत या लोकांना ईश्वर कधीही प्रसन्न होत नाही.

Leave a Reply