४५ वर्षाचे असूनही अक्षय खन्ना या प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी आहेत अविवाहित.. तिच्या आठवणीत तो आजही….

मनोरंजन

अक्षय खन्ना आज 45 वर्षांचा आहे पण तरीही तो अजूनही अविवाहित आहे. इतक्या श्रीमंत आणि मोठ्या स्टारनेही अद्याप लग्न केले नाही हे खूपच आश्चर्यकारक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की असा एक काळ होता जेव्हा अभिनेत्री करिश्मा कपूरचे नाते अक्षय खन्नासोबत होते. पण एका विशिष्ट कारणास्तव लग्न होता होता राहील.

   

घडलं असं होत की करिश्मा कपूरचे वडील रणधीर कपूर आपल्या मुलीचे लग्न अक्षय खन्नाबरोबर करू इच्छित होते. यासाठी त्यांनी अक्षयचे वडील विनोद यांच्याशी मुलीचे नातेही पाठवले. मात्र करिश्माची आई बबितामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही. खरं तर त्या दिवसांत करिष्माची कारकीर्द वरच्या बाजूस जात होती.

अशा परिस्थितीत लग्नामुळे करिश्माच्या कारकीर्दीवर काही परिणाम होईल असे बबिताला वाटत होते. म्हणून तिने त्यावेळी करिश्माला लग्न करण्यास परवानगी दिली नाही.

हे वाचा:   गरिबीत जन्मलेल्या गौतमी पाटीलच असं आहे घर, पहा फोटो....

जरा विचार करा की जर अक्षय आणि करिश्माचे लग्न झाले असेल तर आज दोघांनाही किती फायदा झाला असता. आज अक्षय चाळीशी ओलांडत असूनही तो अविवाहितच आहे, तर करिश्मा घटस्फोट घेऊन घरी बसली आहे.

इथे आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे कि अभिषेक बच्चनबरोबरही करिश्माचे लग्न होणार होते. अगदी दोघेही एकमेकांत खूप गुंतले होते. पण पुन्हा करिश्माची आई बबिताने हे लग्न होऊ दिले नाही.

बबीताची समस्या अशी होती की अभिषेकची आई जया बच्चन यांना लग्नानंतर करिश्माने चित्रपटात काम करायचं नाही असे म्हणणे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिषेकची कारकीर्दही करिष्माच्या तुलनेइतकी नव्हती. या कारणास्तव तिने करिष्माला लग्न तोडण्यास सांगितले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply