हळदीचा करा हा उपाय; प्रत्येक कामात यशस्वी व्हाल, पैसा, धन येईल .!

अध्यात्म

आजच्या लेखामध्ये आपण हळदीचे अनेक उपयोग जाणून घेणार आहोत. अनेकांना हळदी बद्दल खूप सारी माहिती असेलच. हळद हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारी एक वनस्पती आहे.या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे लाभ फायदे सांगण्यात आलेले आहेत. हळदीचा वापर करून अन्नपदार्थांना रंगत आणली जाते. अन्न पदार्थांची चव वाढवली जाते तसेच हळदी पावडर आपल्या घरामध्ये सहज रित्या उपलब्ध होणारी आहे. आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

   

जर तुम्हाला त्वचा विकार असेल, छातीमध्ये कफ साचलेला असेल, सर्दी, खोकला यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर हळदी या सगळ्या समस्यांवर रामबाण औषध मानले जाते. हळदीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्व आहे पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा हळदीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हळदीचा उपयोग आज ही देवपूजा करताना प्रामुख्याने केला जातो. अनेक ठिकाणी हळदीचा वापर भंडारा म्हणून केला जातो. भंडारा हा शिवशंकर यांना प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी शंकराचे पूजा-अर्चना केली जाते अशा ठिकाणी भंडारा आवर्जून उधळला जातो.

ज्योतिष शास्त्रामध्ये देखील हळदीचा खूप मोठा उपाय सांगण्यात आलेला आहे तसेच हळदीचे अर्थ देखील सांगण्यात आलेला आहे. हळदीचा संबंध हा गुरू ग्रह अशी लावण्यात आलेला आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह कमजोर आहे,अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये हळदीचे महत्त्व खूपच गरजेचे असते अशा व्यक्तीने हळदीचा जास्तीत जास्त समावेश आपल्या जीवनामध्ये करायला हवा.

हे वाचा:   मृत्यूनंतरही आ'त्मा आपल्या शरीरात जाण्यासाठी एक तास धडपडत असतो आपल्या नातेवाईकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो....

आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण हळदीचा हमखास वापर करू शकतो. आपण जर गुरुवारच्या दिवशी एक हळकुंड पिवळ्या धाग्यामध्ये बांधून जण गळ्यामध्ये बांधले किंवा एक अलंकार म्हणून नेहमी घातले तर यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होणार आहे.आपल्या सर्वांना हळदीचे अनेक उपयोग माहिती आहेत ज्योतिष शास्त्रामध्ये हळदी किती प्रकारची असते असे सांगितले गेले आहे. एक पिवळी हळद, एक काळी हळद आणि एक नारंगी हळद.पिवळ्या हळदीचा संबंध येत असतो.

काळी हळद ही शनिदेव यांच्या शी संबंधित असते तर नारंगी हळद तिचा संबंध मंगळ ग्रह असतो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये हळदीचे दान करणे अत्यंत शुभ मानले आहे. ज्या व्यक्तीना पाठ दुखीची समस्या आहे.खूप उपचार करून देखील पाठदुखीचे समस्या दूर होत नसेल अशा व्यक्तींनी हळदीचे दान करायला हवे.

सकाळी आंघोळ केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांच्या कपाळी आपल्याला हळदीचा टिक्का लावायचा आहे व जेव्हा कधी आपण एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जाणार असू किंवा साधारणपणे बाहेर जाणार असू तर अशा वेळी कोणत्याही देवी-देवता यांच्या कपाळावरील टिक्का आपल्याला आपल्या कपाळावर अवश्य लावायचा आहे यामुळे त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निवास करेल आणि तुम्ही जे कार्य हाती घेणार आहात. या कार्यामध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जा लवकरच नष्ट होऊन जाईल आणि तुमची प्रगतीचे मार्ग हळूहळू उघडू लागते.

हे वाचा:   २ नोव्हेंबर: धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेतील ही १ वस्तू ठेवा आपल्या ति'जोरीत..वर्षभर पैसा कमी पडणार नाही..घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल..

जर तुमचे लग्न जमत नसेल, लग्न जमताना खूप अडचणी येत असतील, जमलेले लग्न मोडत असेल वैवाहिक जीवन सुखी नसेल तर अशा वेळी हळदीचा उपयोग आवश्यक करायला हवा. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याद्वारे आपल्याला स्नान करायचे आहे.

अंघोळ केल्यानंतर आपल्या कुलदेवते समोर देवतेसमोर आपल्याला थोडा वेळ बसून नामस्मरण करायचे आहे.असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमचे लग्न जुळेल व वैवाहिक समस्या काही असतील तर त्या सुद्धा नष्ट होऊन जातील. सकाळी उठल्यावर आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे. जल अर्पण केल्यानंतर तांब्या मधील हळद आपल्या कपाळाला वगळायला लावायची आहे असे केल्याने तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या नष्ट होऊन जातील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply