जर तुम्ही पण जेवल्यानंतर दररोज बडीशेप खात असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी एकदा नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य

मित्रांनो, तोंड शुद्ध करण्यासाठी आणि घरगुती औषध म्हणून बडीशेप प्राचीन काळापासून वापरली जात आहे. त्याची वनस्पती सुमारे एक मीटर उंच आणि सुवासिक आहे. बडीशेप हि एक प्रकारची बी आहे ज्याचा सुगंध आणि चव दोघ हि खूप छान आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर बडीशेप खायची सवय असते. बडीशेपमधे असे अनेक गुण आहेत जे आपले आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत.

   

मित्रांनो बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शिअम, सोडीअम फॉस्फरस आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. कारण बडीशोपमुळे फक्त एक नाहीतर अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे फायदे.

1. जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खा. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.

हे वाचा:   सोयाबीन खाण्याचे आश्चयर्यकारक फायदे..! मरणाच्या दारातून परत आणेल सोयाबीन..हाय बिपी, शुगर च्या रुग्णांनी जाणून घ्या..

2. बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खाल्ल्यास स्मरणशक्तीही वाढते.
3. दररोज बडीशेप आणि बदाम यांची पावडर समप्रमाणात दररोज दुधात घालून प्यायल्यास दृष्टी चांगली होते. 4. दररोज जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यास पित्ताचा त्रास होणार नाही मळमळ-उलटी आल्या सारखं वाटत असेल तर बडीशेप खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला आराम वाटेल.

5. लठ्ठपणा दूर करायचा असेल तर दररोज जेवल्यानंतर बडीशेप खा. यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल. 6. घश्यात खवखव जाणवत असेल तर बडीशेप दिवसभर थोडी थोडी घेऊन चावून खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल.

7. हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यात तुम्ही खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल आणि बरं वाटेल.

हे वाचा:   फक्त सात दिवस 'हे' तेल केसांना लावल्यास..अकाली पांढरे केस काळे होतील, कोंडा गायब, केस इतके मजबूत बनतील की..

8. पचनशक्ती मजबूत करायची असेल तर सुकी भाजलेली आणि कच्ची बडीशेप समप्रमाणात मिक्स करा आणि रोज खा. तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि शरीराला जडत्वही जाणवणार नाही. 9.बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply