पत्नीनंतर Shahid Kapoor सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करायच्या तयारीत? अखेर तिला Propose केलंच

मनोरंजन

मोस्ट हॅपनिगं कपल म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं ती म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत. वयात मोठा फरक असतानाही शाहिद आणि मीरानं त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. अगदी नवख्या अशा या सेलिब्रिटी वर्तुळात ती स्थिरावली आणि आताआता तर सराईताप्रमाणे वागूही लागली. (Shahid Kapoor Mira rajput)

   

दोन मुलांच्या जन्मानंतर शाहिद आणि मीराच्या कुटुंबाची चौकट पूर्ण झाली. आनंदाची बरसात होत असतानाच काही दिवसांपूर्वी मीरा राजपूतनं एक इन्स्टाग्राम पोस्ट करत लग्नाविषयीचं कॅप्शन दिलं आणि तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगल्या.

पत्मीमागोमाग आता शाहिदही म्हणे दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. बॉलिवूड स्टाईलमध्येच त्यानं मनावर राज्य करणाऱ्या ‘तिला’ प्रपोजही केलं आहे. तिच्यासोबतचा फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्याचं तिच्यावर असणारं प्रेम संपूर्ण जगासमोर आलं.

शाहिदच्या मनाचा ठाव घेणारी आणि जिच्याशी तो दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे ती सौंदर्यवती म्हणजे त्याचीच पत्नी मीरा. सेलिब्रिटी डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहरा (Kunal Mehra Arpita sharma Wedding) यांच्या लग्नाच्या निमित्तानं शाहिदनं त्याच्या पत्नीसह या समारंभाला उपस्थिती लावली होती.

हे वाचा:   अखेर आकाश ठोसरने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला रिंकू आणि मी लवकरच....

या समारंभादरम्यानचाच एक फोटो त्यानं पोस्ट केला. जिथं बॉलिवूडची ही स्टार जोडी सर्वांच्याच नजरा वळवताना दिसत आहे. ‘मुझसे शादी करोगी…’ असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं आहे. आता त्याचं हे प्रपोजल मीरा स्वीकारते का, त्याला ती नेमकं काय उत्तर देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Leave a Reply