अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघं एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात असं वारंवार दिसून येतं. पण आता सैफला त्याच्या दोन मुलांची आई नाही तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आवडू लागली आहे. सैफने हा मोठा खुलासा अभिनेता शाहिद कपूरसमोर केला. एकेकाळी शाहिद आणि करीना रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे चर्चा अधिक रंगली.
हा किस्सा आहे, सैफ आणि कतरिनाच्या ‘फँटम’ चित्रपटा दरम्यानचा. सैफ आणि कतरिनाचा ‘फँटम’ चित्रपट रिलीज होणार होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही झलक दिखलाजा सीझन 8 च्या सेटवर पोहोचले होते. तिथे करण जोहर आणि शाहिद कपूर जजच्या खुर्चीवर बसले होते.
यावेळी करण जोहरनेही सैफला एक प्रश्न विचारला. तुला सर्वात हॉट अभिनेत्री कोणती वाटते? यासाठी त्याने कतरिना कैफ, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर असे पर्याय दिले. या प्रश्नाचं उत्तर देताना सैफने करीनाचं नाव न घेता कतरिना कैफचं नाव घेतलं.
त्यानंतर हाच प्रश्न करणने शाहिदला विचारला, तेव्हा मात्र सावध झाला. त्यामुळे सर्वात जास्त हॉट महिला माझी पत्नी मिरा आहे. असं सांगितलं. त्यानंतर हा प्रश्न कतरिनाला विचारला. यासाठी तिला शाहिद कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि वरुण धवन असे ऑप्शन दिले.
याप्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, माझ्यासाठी सर्वात हॉट व्यक्ती रणबीर कपूर आहे… तेव्हा कतरिना आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये होते.