दुधात भिजवलेली खारीक खाल्ल्याने जे फायदे होतात ते वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य

मित्रांनो, आपल्या घरी दररोज जेवण बनवले जाते. परंतु चांगला आहार घेणे हेदेखील महत्त्वाचे असते. कोणतेही ओबडधोबड पदार्थ खाणे हे आपल्या शरीराला घातक देखील असतात. घरांमध्ये अशा विविध प्रकारचे पदार्थ असतात जे आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे व आपल्या शरीराला पोषक ठरतात. बदाम, काजू, पालेभाज्या, फळभाज्या यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो.

   

त्यापैकीच खारीक हे एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये खारीक अवतेच. त्याचे आयुर्वेदिक शरीराला खूप फायदे होतात. तशातच दुधात भिजवलेली खारीक हे आपल्याला खूपच फायदेशीर ठरते. खारकी मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम हे घटक असतात. त्याचा आपल्या शरीराला खूपच फायदा होतो. याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही.

शरीरामध्ये असणारा अशक्तपणा, थकवा या दुधात भिजवलेल्या खारकी मुळे निघून जातो. तसेच हाय बीपी, चेहऱ्यावरील वंधत्व तसेच वजन यावर ही दुधात भिजवलेली खारिक खूपच फायदेशीर ठरते. दुधात भिजवलेल्या खारकेचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत. परंतु दुधात भिजवलेली खारीक कशा पद्धतीने खायची आहे जेणेकरून त्यांचा आपल्या शरीराला फायदा होईल हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी अनेक जण अंगाने बारीक, सडपातळ असतात. कितीही आहार घेतला तरी त्यांचे वजन वाढत नाही. व्यायाम करतात तरी देखील त्याचा काहीच परिणाम होत नाही. अशा व्यक्तीने सकाळी व्यायाम केल्यानंतर दुधात भिजवलेली खारीक खाल्ल्याने त्याचा खूप मोठा लाभ होतो. खारकी मध्ये ग्लुकोज असल्याने त्याचा फायदा आपणाला वजन वाढीसाठी होतो.

हे वाचा:   कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असे सोन्याहुन मौल्यवान लाजाळू वनस्पतीचे हे आयुर्वेदिक फायदे वाचून आश्चर्य वाटेल …..

एक ग्लासमधे दुधामध्ये पाच खारका संध्याकाळी भिजत ठेवा व सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता या दुधात भिजवलेल्या खारका खा. त्यामुळे दुधातील पोषक तत्वे आणि खारीक एक जीव होऊन यातील सत्वे वाढतात. याचा फायदा आपणाला खूप होतो. तसेच दुधात भिजवलेल्या खारका या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात व आपल्या चेहऱ्यावरील ग्लो वाढवितात.

तसेच आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढवण्यास या खारका उपयुक्त ठरतात. तसेच ब्लड सर्क्युलेशन देखील या खारकामुळे व्यवस्थित चालते. आपल्यापैकी अनेकांना गुडघे दुखी, सांधिवात तसेच कंबर दुखीचा, शरीरातील असह्य वेदना या सर्व आजारांवर दुधात भिजवलेली खारीक सकाळी रिकाम्या पोटी खायचे आहे. त्यामुळे हे सर्व आजार निघून जातील. तसेच कॅल्शिअमचे प्रमाण वाढविण्यास दुधात भिजवलेली खारीक उपयुक्त ठरते.

अनेकांना खूप कष्टाची कामे करावी लागतात. काही वजनदार कामे देखील आपल्यापैकी लोक करतात. तर अशा लोकांनी सलग तीन दिवस दुधात भिजवलेली खारीक खावे. त्यामुळे आपल्यातील कॅल्शियमची कमतरता भरून येते व आपणाला काम करण्यास उत्साह येतो.

अनेक मुलांना अभ्यासातील लक्षात राहत नाही म्हणजे त्यांची स्मरणशक्ती कमी असते. अशा मुलांची आई-वडील खूप काळजी करीत असतात की, माझा मुलगा अभ्यासात पाठीमागे राहिला आहे. त्याची स्मरणशक्ती चांगली नाही. तर अशा मुलांना तुम्ही दुधात भिजवलेली खारीक आवर्जून द्या. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. तर अशा महिलांनी दुधात भिजवलेली खारीक खाण्यास सुरुवात करावी.

हे वाचा:   कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

अनेकांना पोटांच्या बाबतीत समस्या असते म्हणजेच पोट साफ न होणे, पोटात सतत गुडगुड असा आवाज येणे. अशा लोकांनी संध्याकाळी दुधात भिजवलेली खारीक अवश्य खावी. याच्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने तुमचे पोट साफ होत नसेल तर ते पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच गॅसेसचा देखील त्रास कमी होईल.

अनेकांना दातांच्या बाबतीत देखील खूप समस्या असतात की, दात दुखणे, हिरड्या दुखणे तर अशा लोकांनी दुधात भिजवलेली खारीक खाल्ल्याने त्यांचे दात व हिरड्या मजबूत बनतात. तर मित्रांनो अशी ही दुधात भिजवलेली खारीक बहुपयोगी अशी आहे. तर तुम्हाला देखील यापैकी कोणता त्रास असेल तर दुधात भिजवलेल्या खारकेचे सेवन अवश्य करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply