अवॉर्ड शो मध्ये कोणीतरी रणवीर सिंगच्या गालावर मारली जोरदार झापड, व्हिडिओ वायरल

मनोरंजन

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक हिरो अशी ओळख असलेला रणवीर सिंगचं (Ranveer singh) न्यूड फोटोशूट प्रकरण बरंच गाजलं. आता रणवीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निमित्त साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवार्ड्सचं.

   

नुकताच बेंगळुरू येथे SIIMA सोहळा पार पडला. अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, कमल हासन अशा साऊथच्या दिग्गजांसोबत रणवीरनेही या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

या सोहळ्यात रणवीरला दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. पण याचदरम्यान रणवीरसोबत असं काही घडलं की, सगळेच स्तब्ध झालेत. होय, गर्दीत कोणीतरी रणवीरच्या गालावर जोरदार थापड मारली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओत रणवीरला चाहत्यांनी घेरलेलं दिसतं. याचदरम्यान रणवीरच्या गालावर कुणीतरी थापड मारल्याचा दावा, या व्हिडीओसोबत केला गेला होता. अर्थात असं काही घडलेलं नसून त्याच्या बॉडीगार्डचाच हात चुकून त्याच्या गालावर लागला. त्याचं झालं असं की, रणवीर दिसताच चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली.

हे वाचा:   वयाच्या 17 व्या वर्षी बनली होती वैश्या, बॉलीवूड मध्ये येऊन असे बदलले जीवन

मीडियानेही या गर्दीत भर घातली. गर्दीपासून बचावासाठी बॉडीगार्डने रणवीरला घेरलं. पण लोक ऐकेनात. अशात गर्दीला आवरताना एका बॉडीगार्डचा हात रणवीरच्या चेहऱ्याला लागला आणि रणवीर गाल चोळताना दिसला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. पण दुसऱ्याच क्षणाला फार काही रिअ‍ॅक्ट न करता हसत हसत त्याने परिस्थिती सांभाळली.

अवार्ड शोमध्ये रणवीरने नेहमीप्रमाणे धम्माल मस्ती केली. स्टेजवर तो ‘पुष्पा’ या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी त्याने अल्लू अर्जुनची हुक स्टेपही केली.व्हिडिओमध्ये, रेड कार्पेटवर रणवीर सिंग पांढरा सूट परिधान करताना दिसत आहे.

या अवॉर्ड नाईटपासून अल्लू अर्जुन आणि रणवीर सिंगचे अनेक मजेदार क्षण व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसत आहेत.

Leave a Reply