विश्वातील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा काही दिवसांपासुन बहुविध कारणांनी चर्चेत आला आहे. एक एक कलाकार शो सोडून जात आहेत, त्यातच काही नवी नावं मालिकेशी जोडली जात आहेत. आता म्हणे मालिकेतील अत्यंत महत्त्वाचं पात्रच बदललं आहे. ‘तारक मेहता’ हे पात्र साकारणाऱ्या ‘शैलेश लोढ़ा’ यांनी शो चा निरोप घेतल्यानंतर आता त्यांची जागा एका नव्या कलाकारानं घेतली आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘शैलेश लोढ़ा’ शो मध्ये दिसत नव्हते. चाहतेही मोठ्या प्रमाणात याबद्दल नाराजी व्यक्त करत होते. पण आता मेकर्स ने चाहत्यांची निराशा दूर करण्यासाठी नवीन तारक मेहताची एंट्री केली आहे.
शैलेश लोढ़ांच्या जागेवर शो मध्ये अभिनेता ‘सचिन श्रॉफ’, ‘तारक मेहता’ हे पात्र साकारणार आहे आणि याच दरम्यान शो चा नवीन प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता सचिन श्रॉफची झलक पाहायला मिळत आहे.
‘Promo Video’ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की तारक ची पत्नी अंजलीसुद्धा दिसत आहे. प्रोमोत सचिनचा पुर्ण चेहरा दाखवला नसला तरीही चाहत्यांनी मात्र त्याला अगदी सहजपणे ओळखलं आहे.
व्हिडीओ अपलोड केलेल्या पोस्टमधील कमेंट सेक्शनला चाहत्यांचे खुप कमेंट्स येत आहेत. कोणी लिहीत आहे की त्यांना नवीन तारक पाहायचा आहे तर कोणी लिहीत आहे की जुन्या तारक मेहताला शो मध्ये पुन्हा आणा. काहींनी तर हा नवा प्रोमो पाहून तुम्ही ‘तारक मेहता’ बदलला, आता ‘जेठालाल’ मात्र बदलू नका अशी इशारावजा विनंतीच केली आहे.
दरम्यान, नव्या तारकविषयी सांगावं तर, त्यानं म्हणजेच सचिननं ‘सात फेरे’, ‘बालिका वधू’ आणि हल्लीच चालू असलेला ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरिक्त ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्येही काम त्यांनं काम केलं होतं.