बोल्ड वेबसीरीज साठी प्रसिद्ध असणाऱ्या अल्ट बालाजी प्लॅटफॉर्मवर एक नवी कोरी सीरीज लवकरच येत आहे. पौरुषपूर ही आगामी सीरीज बोल्ड सीन्ससाठी आधीच चर्चेत आहे.
पौरुषपूर मध्ये २६ वर्षीय अभिनेत्री अश्मिता बख्शी व ६४ वर्षीय अनु कपूर यांच्यात अनेक इंटिमेट सीन शूट करण्यात आले आहेत.
आपल्याहून ३८ वर्ष मोठ्या अभिनेत्यासह अशाच एक सीनचा अनुभव अभिनेत्री अश्मिता बख्शीने शेअर केला आहे.
या सीन मध्ये अनु कपूर अश्मितासह इंटिमेट होण्याआधी तिच्या पाठीवर गरम मेण ओतताना दिसत आहेत.
या सीनविषयी अश्मिता सांगते की, ते मेण खरंच खूप गरम होते, यामुळे माझ्या त्वचेला त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली होती पण तरीही वेदना झाल्याचं.
सीन शूट करण्याआधी अश्मिताच्या पाठीवर सिलिकॉनचा थर लावण्यात आला होता ज्यामुळे त्वचा भाजली नाही..
अश्मिता मूळची मुंबईकर असून तीन वर्ष मेहनत केल्यावर तिला या सीरीजमध्ये संधी मिळाली आहे.
यापूर्वी अश्मिताने गोविंदासह फ्रायडे तसेच सनी देओल सह भैय्याजी सुपरहिट व श्रद्धा कपूरसह हसीना पारकर या सिनेमात विशेष भूमिका साकारली होती.
दरम्यान पौरुषपूर मध्ये अश्मिता व अनु कपूर यांच्यासह मिलिंद सोमण, शिल्पा शिंदे यांनीही बोल्ड भूमिका साकारली आहे.