मोठा खुलासा! बिनधास्त काव्या फॉलोअर्स वाढवण्यासाठी झालेली गायब; आई-वडिलांनी असा रचलेला बनाव

Uncategorized

औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती. यानंतर काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती.

   

याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा खटाटोप केला असल्याचं समोर आलं आहे.टिक टॉक स्टार काव्या बिनधास्त गायब झाल्याची घटना समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली होती.

मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हा खटाटोप केला होता. कारण विविध समाजमाध्यमांवर फॅनकडून जेवढा प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात अर्थार्जन होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.

हे वाचा:   चाळीत राहणाऱ्या भाऊ कदमचं डोंबिवलीतील आलिशान घर पाहिलं का?

काव्याचे विविध समाजमाध्यमांवर पाच मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स आहेत. 9 सप्टेंबर रोजी ती अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या आई-वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. ती आपला फोन घरीच विसरल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा लॉक असलेला फोन उघडून फोनमध्ये व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर भावनिक सादही घातली. यावेळी दोघंही रडले. या सगळ्यानंतर काव्य मध्य प्रदेशातील स्टेशनवर सापडली. यानंतर असं सांगितलं गेलं की घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली होती.

मात्र, सत्य काही वेगळंच होतं.इटारसी स्थानकावर काव्या पोहोचताच तिथे पोलीस आणि तिचे आई-वडील हजर झाले. यानंतर इटारसीच्या पोलिसांनी तिथल्या बाल न्याय मंडळासमोर तिला हजर करणं कायद्यानुसार बंधनकारक होतं.

मात्र, या सर्व बाबींना फाटा देत पोलीस तिला सरळ औरंगाबादला घेऊन आले आणि आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. हा सगळा खटाटोप फक्त पैशांसाठी केला गेला, त्यामुळे काव्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.याबाबत बोलताना बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके म्हणाल्या की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं.

हे वाचा:   डब्ल्यूडब्ल्यूईचा किंग द ग्रेट खलीची पत्नी दिसायला कतरिनालाही देते धोबी पछाड़ , शरीर आणि व्यक्तिमत्त्वात आहे परफेक्ट फिट

हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होतं. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply