सचिन तेंडुलकरची लेक सारा अडकणार लग्नबंधनात? मेहंदीचे फोटो समोर…

मनोरंजन

भारतरत्न आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अनेकदा चर्चेत असतो. इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबात, विशेषतः मुलगी सारा तेंडुलकरचं सोशल मीडियावर वर्चस्व आहे. सारा भले ही फिल्मस्टार नसेल, पण असं असूनही तिची लोकप्रियता फिल्मी हिरोइनपेक्षा कमी नाही.

   

सारा तेंडुलकर अनेकदा तिच्या क्यूट लूकने आणि स्माईलने लोकांची मने जिंकते. आता साराचे असे काही फोटो समोर आले आहेत, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

वास्तविक, साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. जरी हे फोटो जुने असले तरी पुन्हा एकदा या फोटोंनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. या फोटोत तिच्या हाताला मेहंदी लागल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी सारा तेंडुलकर लग्न करणार की काय अशी अटकळ बांधायला सुरुवात केली आहे.

हे वाचा:   या अभिनेत्रीच्या पतीने त्यांच्या हनीमूनच्या रात्रीच लावली होती पत्नीची बोली..!

मात्र , दुसऱ्या फोटोमध्ये सारासोबत दुसरी मुलगी दिसत आहे. साराने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, तिच्या बहिणीचं लग्न होत आहे आणि ती याबद्दल खूप उत्सुक आहे.

सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचंही बोललं जात आहे. सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी या वृत्तांचं खंडन केलं होतं. तसं, साराने यापूर्वीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी तिने अजिओलक्स ब्रँडसाठी प्रमोशनल फोटोशूटही केलं होतं.

सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, सारा अजूनही तिच्या अभ्यासात व्यस्त आहे आणि सध्या तिला चित्रपटात दिसण्याची ईच्छा नाही. सारा तेंडुलकरचं नाव अनेकदा क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, दोघांनीही या नात्याबद्दल अद्यापतरी काहीही सांगितलेलं नाही.

हे वाचा:   संजय दत्तच्या मुलीला पाहून व्हाल फिदा.. दिसते इतकी सुंदर आणि हॉ-ट की बॉलीवूड अभिनेत्र्या देखील हिच्यासमोर फिक्या आहेत..

सारा तेंडुलकर तिची आई अंजलीसारखीच सुंदर आहे. साराचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ती फक्त 522 लोकांना फॉलो करते. यामध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे.

Leave a Reply