आलिया पाठोपाठ कंगनाही साकारणार देहविक्री करणाऱ्या स्त्रीची भूमिका; बायोपिकबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेत असते. ती गेले अनेक महिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. अशातच आता तिने आणखी एका चित्रपटात दिसणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आलिया भट्टनंतर आता कंगनाही वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचे पात्र साकारताना दिसणार आहे.

   

अलीकडेच, जेव्हा आलिया भट्टने देहविक्री करणाऱ्या गंगूबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली तेव्हा तिचे काही लोकांनी कौतुक केले आणि अनेकांनी तिला टोमणे मारले. या यादीत कंगना रणौतचे नाव देखील होते. कंगनानेही या भूमिकेवरून आलियाला खूप ट्रोल केले. पण आता कंगना स्वतः एका देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तिने याचा खुलासा केला आहे.

हे वाचा:   ऋषभ पंतसोबतची अधुरी कहाणी उर्वशी रौतेला दाखवणार मोठ्या पडद्यावर? म्हणाली ‘जब दिल लगा तब’

कंगना रणौतने एक नवीन बायोपिक करणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. या बायोपिकमध्ये ती बंगालमधील थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासी यांची भूमिका साकारणार आहे. त्यांना नटी बिनोदिनी या नावानेही ओळखले जायचे. या बायोपिकचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत. प्रदीप सरकार हे परिणीता या चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटाबाबत कंगना म्हणाली, “मी प्रदीप सरकार यांची खूप मोठी फॅन आहे आणि मला ही संधी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. यासोबतच लेखक प्रकाश कपाडिया यांच्याबरोबरचा हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मला अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणार असल्याने मी खूप खुश आहे.”

कोण होत्या बिनोदिनी दासी?

कंगना रणौतने या बायोपिकची घोषणा केल्यापासून सगळेच जण नटी बिनोदिनी या नक्की कोण आहेत हे जाणून घेण्याच्या मागे आहेत. बिनोदिनी दासी यांचा जन्म कोलकत्ता येथील वेश्या समाजात झाला. त्यांचे लग्न वयाच्या ५ व्या वर्षीच झाले होते. पण काही वर्षांनी त्यांच्या पतीसोबत त्यांनी काहीच संबंध ठेवले नव्हते. वयाच्या १२ व्या वर्षी बिनोदिनी यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पण वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी अभिनय करणे सोडून दिले. त्या खूपच गरीब कुटुंबातून आल्या होत्या आणि त्या स्वतः देखील वेश्या व्यवसायाचा भाग होत्या, असेही बोलले जाते. इतकेच नव्हे तर, बिनोदिनी यांच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वतःचा उल्लेख देहविक्री करणाऱ्या म्हणून केला होता.

Leave a Reply