उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? आधी केले गंभीर आरोप अन् आता म्हणाली “आय लव्ह यू”

Uncategorized

‘हाय हाय ये मजबूरी…’ म्युझिक व्हिडीओमुळे सध्या उर्फी जावेद खूप चर्चेत आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टग्रामावर शेअर करताना दिसते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं. पण ती या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहत नाही. आपल्या पोस्टमुळे काही वेळा ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. अशात आता तिने एक्स बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

   

उर्फी जावेदच्या वाढदिवसाचं दोन दिवस आधीच सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ उर्फीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फी जावेदचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती रडताना दिसली होती. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ तिचा एक्स बॉयफ्रेंड पारस कलनावतने शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं, “अरे अरे असं कोण रडतं? मी तर १५ तारीखलाही तुला शुभेच्छा देणार आहे.” पारसची ही पोस्ट शेअर करताना उर्फीने लिहिलं, “माझं तुझ्यावर प्रेम आहे पारस(आय लव्ह यू पारस)”

हे वाचा:   अनुष्का शर्माच्या आधी या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता विराट कोहली, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या प्री-बर्थ पार्टीमधील काही व्हिडीओ आणि फोटोही शेअर केले होते. ज्यात अंजली अरोरा आणि पारस कलनावतही दिसला होता. याशिवाय तिच्यासह तिचे भाऊ बहीणही या व्हिडीओमध्ये दिसले होते. उर्फी जावेदचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला असतो. पण तिच्या मित्रपरिवाराने ३ दिवस आधीच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. खासकरून या पार्टीमध्ये एक्स बॉयफ्रेंड पारस कलनावतने येणं आणि उर्फीसह फोटो शेअर करणं सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती.

दरम्यान पारस आणि उर्फी जावेद यांची ओळख ‘दुर्गा’ मालिकेच्या सेटवर झाली होती. याच सेटवर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. उर्फीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘अनुपमा’ मालिकेत तिला महत्त्वपूर्ण भूमिका मिळत होती मात्र पारसने निर्मात्यांना सांगून तिला मालिकेतून बाहेर केलं. याशिवाय या दोघांनी ब्रेकअपनंतर एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अशाता आता पुन्हा एकादा त्यांना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Leave a Reply