करीना कपूर ने २ कोटींची गाडी घरी आल्यान केलं असं काही की, नेटकरी म्हणाले इतकं श्रीमंत व्हायचंय

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या रॉयल लाइफस्टाइलच्या नेहमीच चर्चा रंगताना दिसतात. सस्ती चीजों का शौक तो हम नहीं रखते…असं तिच्या लाइफस्टाइलच्या बाबतीत बोललं जातं. साधा टीशर्ट तिचा ३०-४० हजारांचा असतो.

   

त्यामुळं तिच्या महागड्या वस्तूंची नेहमीच चर्चा होते. तसंच तिच्या गाड्यांबद्दलही बोललं जात. तिनं नुकतीच दोन कोटींची अलिशान कार खरेदी केलीय.

करिनाला महागड्या गाड्यांची आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तिच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीजची भर पडली आहे. तिनं नुकतीच ही दोन कोटींची कार खरेदी केली आहे. करिनाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ही कार तिनं तिच्या धाकट्या लेकासाठी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

करिनाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला प्रचंड ट्रोलही करण्यात येत आहे. दोन कोटींची गाडी घरी आली आहे म्हटल्यावर एखादा व्यक्ती आनंदानं, हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करेल, पण या व्हिडिओत करिनाचे हावभाव पाहिल्यानंतर तिला याचं काहीच अप्रुव वाटत नसल्याचं दिसून येतंय.

हे वाचा:   Big B अमिताभ बच्चन यांची नात करतेय प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; कारमध्ये दिसली अशा अवस्थेत

त्यामुळं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. बस्स, एवढंच श्रीमंत व्हायचंय, की दोन कोटीची कार बघून असे एक्सप्रेशन्स देता येतील. असं काही युझर्सनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करिनानं तिचा मोठा मुलगा तैमूरसाठी जीप ही महागडी गाडी खरेदी केली आहे.

Leave a Reply