बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिला शुभेच्छा देत आहेत. नर्गिसने 2011 मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील नर्गिसचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. यानंतर नर्गिस ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘ढिशूम’ सारख्या चित्रपटात दिसली. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून नर्गिसची स्क्रीन प्रेझेन्स कमी झाली आहे.
नर्गिस फाखरी कास्टिंग काउचची शिकार झाली आहे.
नर्गिस फाखरीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, ती बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिने दिग्दर्शकासोबत रात्र घालवण्यास नकार दिला होता, ज्यामुळे तिला अनेक चित्रपटांमधून बाहेर फेकण्यात आलं होतं.
एडल्ट स्टार ब्रिटनी डी ला मोरासोबतच्या संभाषणात नर्गिस म्हणाली होती. “मला नेहमीच माहित होतं की मला कशाची भूक लागली आहे. मला प्रसिद्धीची भूक आहे म्हणून मी काहीही करण्यास सहमत नाही. मी न्यूड होऊ शकत नाही किंवा दिग्दर्शकासोबत रात्र काढू शकत नाही. त्यामुळेच मी हे न केल्यामुळे मी बरीच कामं गमावली आहेत. काही गोष्टी धक्कादायक होत्या.
“नर्गिसची पोस्ट
नर्गिस फाखरी पुढे म्हणाली, “माझं एक स्टॅण्डर्ड होतं, माझ्याकडे एक सीमा होती. पण जेव्हा मला एकापेक्षा जास्त वेळा चित्रपटातून काढून टाकलं गेलं तेव्हा मला वाईट वाटलं. पण नंतर मला कळालं की, चांगले लोक नेहमीच जिंकतात.” एंटरटेनमेंट न्यूजच्या वृत्तानुसार, नर्गिस फाखरीने असंही सांगितलं की, तिला न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती. परंतु अभिनेत्रीने तसं करण्यास नकार दिला.