गायिका Neha kakkar चं गाण एकूण जजचं भडकला, म्हणाला,`तोंडावर कानाखाली…`

Uncategorized

प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन आयडलवर (Indian Idol) बनावट असल्याचा ठपका पडलाय. त्यामुळे हा शो वादात सापडला आहे. या स्पर्धेतील टॉप 15 कंटेस्टंट जाहीर झाल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. तसेच या रिअॅलिटी शोमध्ये असलेल्या विशाल ददलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कर (Neha kakkar) या जजेसच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यात आता नेहा कक्करचा एक किस्सा समोर आला आहे. या किस्स्यात तिला जजने फटकारले होते. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. नेमकं हे प्रकरण आहे, ते जाणून घेऊय़ात.

   

व्हिडिओत काय? 

नेहा कक्करची (Neha kakkar) थ्रो बॅक ऑडिशन क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रिफ्युजी चित्रपटातील ‘ऐसा लगाता है’ हे गाणे एका दुसऱ्या कंटेस्टंटसोबत गाताना दिसत आहे. या तिच्या गाण्याला जज करण्यासाठी समोर फराह खान, अनु मलिक आणि सोनू निगम जजच्या भूमिकेत दिसत आहेत.

हे वाचा:   'इतका अहंकार चांगला नाही'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडीओवरुन भडकले लोक

हे गाणे पुर्ण झाल्यानंतर जजेस आपले कमेंट देतात. अनु मलिक (Anu Malik) तिच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना संतापलेला दिसतो. तो म्हणतो,नेहा कक्कर, तुझे गाणे ऐकून मला वाटते, मी माझ्या कानाखाली मारून घेऊ. मलिक यांच्यानंतर फराह आणि सोनूने गाण्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान नेहा कक्कर (Neha kakkar) संदर्भातला हा किस्सा 2006 दरम्यानचा आहे. त्यावर्षी नेहाने इंडियन आयडॉलमध्ये (Indian Idol) पार्टीसिपेट केले होते. मात्र नेहा कक्करचा या शोमधील प्रवास फार मोठा नव्हता आणि ती लवकरच बाहेर पडली होती.

इंडियन आय़डॉलमधून (Indian Idol) बाहेर पडल्यानंतर नेहाने (Neha kakkar) हार मानली नाही. तिने हळूहळू तिच्या मेहनतीने संगीत विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.आता ती बॉलिवूडमधली एक प्रसिद्ध सिंगर आहे.दिग्गज गायकांमध्ये तिचे नाव गणलं जात.

हे वाचा:   CID मालिकेतील अभिनेत्याच्या दुचाकीचा अपघात, शूटींगसाठी जात असताना घडली घटना

दरम्यान नेहा (Neha kakkar) सध्या फाल्गूनी पाठक (Falguni Pathak) सोबत वादामुळे चर्चेत आहे. नेहाने ‘मैने पायल है चनकाई’ हे रिमिक्स गाणे गायले होते. हे ओरिजनल गाण 90 च्या दशकात फाल्गुनीने गायले होते.त्यामुळे नेहाच्या (Neha kakkar) या रिमिक्सवरून फाल्गूनी संतापल्या होत्या.

Leave a Reply