घटस्फोटाच्या वृत्तांवर दीपिकाने सोडले मौन; म्हणाली- ‘मी आणि रणवीर…’

Uncategorized

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहे. त्यांच्यातले प्रेम, रोमान्स आणि स्पेशल बॉन्डिंग सर्वांनाच आवडते.

पण, गेल्या काही काळापासून दीपिका आणि रणवीर यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दीपिका आणि रणवीर लवकरच फारकत घेणार असल्याचे वृत्तही समोर आले. या सर्व बातम्यांवर आता स्वतः दीपिकाने उत्तर दिले आहे.

एका ट्विटमध्ये दीपिका आणि रणवीर घटस्फोट घेणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर मीडियामध्ये याबाबत बातम्या पसरल्या. पण, अखेर दीपिकाने घटस्फोटाच्या वृत्तांवर मौन सोडले.

दीपिकाने अभिनेत्री मेगन मार्कल (Meghan Markle)सोबत एक पॉडकास्ट रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तिने तिच्या आणि रणवीरच्या नात्याबद्दल खुलासा केला. आपल्या वक्तव्याने तिने घटस्फोटांच्या सर्व बातम्यांना खोडून काढले आहे.

हे वाचा:   दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून सोबत राहत होता हा अभिनेता, 20 वर्षांनी बसला धक्का; काय आहे नेमका प्रकार?

काय म्हणाली दीपिका..?पॉडकास्टमध्ये दीपिका म्हणाली- ‘रणवीर आणि मी कामामुळे खूप दिवसांपासून एकमेकांपासून दूर आहोत. एका आठवड्याच्या मुझिक कॉन्सर्टनंतर मी परतलीये.

मला पाहून त्याला खूप आनंद होईल.’ पॉडकास्टमधील दीपिकाच्या या विधानाने स्पष्ट झाले आहे की, आजही रणवीर आणि दीपिका एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत.

Leave a Reply