‘दृश्यम २’ चित्रपटात तब्बू साकारणार ‘ही’ भूमिका, समोर आली पहिली झलक

Uncategorized

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

   

लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील कलाकारांचे लूक समोर यायला सुरुवात झाली आहे.

‘दृश्यम २’ हा अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘दृश्यम २’मध्ये काय होणार हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सगळेजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये तब्बूच्या चेहऱ्यावरील हावभाव आक्रमक दिसत आहेत. ती दोन पोलिसांच्या मागे उभी आहे.

हे वाचा:   एकेकाळी होते खाण्याचे वांदे, आणि आता आहे कोट्यावधीचा मालक, वाचा या साऊथच्या स्टारची स्टोरी

यातून तब्बू या चित्रपटात तिच्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तब्बूचे हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच या चित्रपटाच्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासोबतच आता या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तब्बूचं हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, त्यालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती.

हे वाचा:   बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी गर्लफ्रेंडनं लिहिलं असं काही की... वाचल्यावर हसून हसून पोट दुखेल

अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या.

कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply