देवमाणूस फेम किरण गायकवाड प्रेमात? या अभिनेत्रीसोबतचा रोमॅन्टिक व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Uncategorized

क्षणाक्षणाला वाढवणारी उत्कंठा आणि कथानकाला मिळणारं रंजक वळण यांची उत्तम सांगड घालत छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मालिकेतील सर्व कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

   

मालिकेचं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. दुसरं पर्व संपताना प्रेक्षकही भावुक झाले होते. मालिकेचा मुख्य चेहरा असलेला अभिनेता किरण गायकवाड सध्या काय करतोय हा प्रश्न प्रेक्षक तसंच त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

किरण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे रिल्स व्हायरल होताना दिसतात. पण नुकताच त्यानं शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. चर्चेचं कारण म्हणजे, एका रोमॅन्टिक गाण्यावर त्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हा रिल व्हिडिओ बनवलं आहे. त्यामुळं या दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

‘लागीरं झालं जी’ या मालिकेत किरणनं भय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. या मालिकेतील किरणची सहकलाकार पूर्वा शिंदे हिच्यासोबत त्यानं हा रिल्स व्हिडिओ शेअर केलाय. ‘लागीरं…’मध्ये दोघंही नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. पण सध्या त्यांच्या या रोमॅन्टिक व्हिडिओची जोरात चर्चा सुरू आहे.

हे वाचा:   ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीला ‘या’ देशात डान्स करण्यास मनाई; कारण ऐकून थक्क व्हाल

किरण आणि पूर्वाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. छान जोडी आहे, वगैरे अशा कमेंट्स या व्हिडिओखाली पाहायला मिळत आहेत.दरम्यान, ही काही पहिली वेळ नाही , की किरण आणि पूर्वाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Leave a Reply