देवेंद्रजींना फराळात ‘हा’ पदार्थ खायला आवडतो, अमृता फडणवीसांनी सांगितले गुपित

Uncategorized
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे.
त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत.यावेळी त्यांना राज्यातील राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले.
बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना प्रश्न विचारले.देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या फराळातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
त्यावर अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांच्या फराळातील आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले.“देवेंद्र फडणवीस यांना फराळात पोहेतरी खूप आवडते.”“त्या बरोबर त्यांना मोदक आवडतात.”“तसेच त्यांना करंजी खायलाही खूप आवडते”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.त्या बरोबरच नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडीबद्दल भाष्य केले.
“मी खादाडच आहे आणि मला सर्वच पदार्थ आवडतात.”“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”“त्यामुळे मी रागावल्यावर मला खायला मिळाले की लगेच राग निवळतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”

हे वाचा:   जेव्हा पैशांवरून घासाघिस करणाऱ्या अशनीर ग्रोव्हरला सलमानच्या मॅनेजरने फटकारलं; म्हणाला “तू भाजी विकत…”

Leave a Reply