‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार अमृता फडणवीस, पाऊल ठेवताच म्हणाल्या, “मी आले असते तर…”

Uncategorized

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. यंदाचं बिग बॉसचे पर्व हे ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसांपासूनच बिग बॉसच्या घरात वाद, भांडण आणि गॉसिप्सला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस येणार आहेत. नुकतंच याचा प्रोमो समोर आला आहे.

   

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील कावेरी – राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे या जोडीने हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर साप्ताहिक कार्य सोपवले. या साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले. या उपकार्यात टीम A विजेती ठरली.

हे वाचा:   68 वर्षीय आजोबाने 24 वर्षीय नातीला केलं प्रेग्नेंट, नंतर केलं लग्न; सत्य समोर आल्यावरही दिला नाही घटस्फोट

सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी दिवाळीचे औचित्य साधत आज घरामध्ये समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस येणार आहेत. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस यांच्या साथीने दिवाळी सण साजरा केला जाणार आहे.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस एंट्री करताना दिसत आहेत. यावेळी त्या घरातील सदस्यांबरोबर मजा मस्ती डान्स करताना दिसत आहेत. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, जर मी बिग बॉसमध्ये आली असती तर मला बाहेर पडायची इच्छाच झाली नसती. हे फारच सुंदर आहे. अमृता फडणवीस यांच्यासमोर साप्ताहिक कार्य रंगले. सध्या हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Reply