बॉलिवूडचा दमदार गायक-रॅपर बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

Uncategorized

मुंबई, 12 ऑक्टोबर-  आपल्या दमदार आवाजाने गायक-रॅपर बादशाहने आजच्या तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. त्याच्या प्रत्येक गाण्यावर लोक थिरकताना दिसून येतात. मीडियावर बादशाहची मोठी फॅन फॉलोईंग आहे. चाहते सतत त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात डोकावून पाहात असतात.

   

बादशाहच्या लव्ह लाईफबाबत घ्यायला सर्वच उत्सुक आहेत. पहिल्या लग्नातुन घटस्फोट घेतल्यापासून बादशाह सिंगल असल्याचं सांगत असे. परंतु आता बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री झालेली दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे.

गायक आणि रॅपर बादशाह एका तरुणीच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जात आहे. ही तरुणी कोणतीही गायिका नसून एक पंजाबी अभिनेत्री आहे. बादशाह एका सुंदर पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या बादशाह पंजाबची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा रेखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

हे वाचा:   आईला फोन केला म्हणून... बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं

नुकतंच पिंकव्हीलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, बादशाह अभिनेत्री ईशा रेखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.इतकंच नव्हे तर गेली एक वर्ष हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचंही रिपोर्टमध्ये उघड केलं आहे.

नुकतंच बादशाह ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्ह्स’ या सीरिजमध्ये दिसला होता. तसेच बादशाहने करण जोहरशीही बोलताना स्वतःला सिंगल म्हटलं होतं. त्यानंतर आता बादशाह पंजाबी अभिनेत्री ईशा रेखीला डेट करत असल्याचं वृत्त समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. पार्टीमध्येच दोघांमध्ये मैत्री झाली आणि सध्या हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

बादशाहला आपल्या खाजगी आयुष्याबाबत फारसं बोलायला आवडत नाही. त्याला आपलं खाजगी आयुष्य नेहमीच लाइमलाईटपासून दूर ठेवणं पसंत आहे. बादशाह आणि ईशा जवळपास 1 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं आता म्हटलं जात आहे.

हे वाचा:   “१८ वर्षांपूर्वी मी आईला गमावलं आता…”; प्रसिद्ध अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान

या रिपोर्ट्सनुसार बादशाह आणि ईशा रेखीने आपल्या नात्याबाबत आपल्या घरातदेखील सांगितलं आहे. या दोघांची पार्टीमध्ये भेट घडून आली होती. ओळख झाल्यानंतर या दोघांनाही आपल्या विचारात बरचसं साम्य असल्याचं जाणवलं. त्यानंतर दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. हे दोघेही एकेमकांना प्रचंड पेस्ट करतात. रिपोर्ट्सनुसार दोघेही आपल्या नात्याबाबत कोणतीही घाईगडबड करु इच्छित नाहीत.

बादशाहने यापूर्वीदेखील लग्न केलं होतं. पहिल्या लग्नापासून त्याला एक लेकसुद्धा आहे. परंतु पत्नीसोबतच्या वादानंतर ते दोघे विभक्त झाले होते. 2019 मध्ये त्यांच्यातील वाद समोर आला होता. बादशाहच्या पहिल्या पत्नीचं नाव जस्मिन असं आहे. ती सध्या बादशाहपासून विभक्त राहते. ती सध्या आपल्या लेकीला घेऊन लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. जस्मिन नेहमीच मीडियापासून दूर राहिली आहे.

Leave a Reply