माधुरी दीक्षितने वरळीमध्ये ५३ व्या मजल्यावर घेतलं आलिशान घर, Photo पाहून व्हाल थक्क!

मनोरंजन

बाॅलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनं मुंबईत वरळीमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. सध्या या घराबद्दल खूप चर्चा सुरू आहे. माधुरी आणि डाॅ. श्रीराम नेने यांनी हे घर सुपर प्रीमियम रेजिडेंशियल प्रोजेक्ट इंडियाबुल्स ब्लू इथे खरेदी केलं आहे. हे घर म्हणजे अगदी स्वप्नवतच आहे. घरातून समुद्राचा नजारा दिसतो.

   

माधुरी दीक्षितनं हे घर ४८ कोटी रुपयांना खरेदी केलंय. प्रति स्क्वेअर फूट या घराची किंमत ९० हजार रुपये आहे. या वर्षातला हा सर्वात महागडा व्यवहार मानला जातोय. ही एरिया पाॅश समजली जाते. इथे सगळ्या सुख-सोयी आहेत.

नव्या घराचा एरिया आणि कार पार्किंग

माधुरी दीक्षितचं हे नवं घर ५,३८४ स्क्वेअर फूट आहे. इंडियाबुल्स ब्लू या टाॅवरमध्ये ५३ व्या मजल्यावर हा राजमहल आहे. घराबरोबर सात कार्ससाठीचं पार्किंग आहे.

हे वाचा:   जेव्हा संजय दत्तने मान्यताच्या घा"णे"र"ड्या फिल्मचे सर्व हक्क रातोरात विकत घेतले....

याच सोसायटीत दर महिना १२ लाख रुपये भाडं देऊन माधुरी रहात होती

काही दिवसांपूर्वी माधुरीनं याच टाॅवरमध्ये भाड्यावर घर घेतलं होतं. त्याचं भाडं दर महिना १२ लाख रुपये होतं. ते साडे पात हजार स्क्वेअर फीट होतं. अपूर्वा श्राॅफनं ते डिझाइन केलं होतं.

माधुरी दीक्षितचं एक घर हरियाणात होतं.

२०१९ मध्ये तिनं ते विकलं. ते घर ३.२५ कोटी रुपयांना विकलं गेलं. १९९६ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून हे घर दिलं होतं.

माधुरीच्या डाॅक्टर पतीकडे अनेक लग्झरी कार्स आहेत. खूप संपत्तीही आहे. माधुरी एका सिनेमासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेते आणि रिअॅलिटी शोसाठी २५ कोटी रुपये. सध्या ती झलक दिखला जा १० शो जज करते. ती प्रत्येक एपिसोडसाठी ३० लाख रुपये घेते.

Leave a Reply