“…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं खर कारण

Uncategorized

अभिनेत्री मलायका अरोरा ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या नृत्याने तिने सर्वांना वेड लावलेच पण तिच्या अभिनय कौशल्याची छापही प्रेक्षकांवर पाडली. मलायका ‘हाऊसफुल’, ‘कांटे’ आणि ‘ईएमआय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसली होती. पण तिने कधीही कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या नाहीत.

   

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल’ हा शेवटचा चित्रपट, ज्यात मलायका महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती. पण त्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून का दूर राहिली, असा प्रश्न गेली अनेक वर्ष तिच्या चाहत्यांना पाडला आहे. अखेर तिने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

मलायका अरोराने अलीकडेच ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याचे कारण स्पष्ट केले आहे. मलायका अरोरा २४ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आली. तिने ‘छैय्या छैय्या’, ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘अनारकली डिस्को चली’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांवर नृत्य केले. त्याशिवाय मलायका अरोराने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली. मात्र ती चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत का दिसत नाही हे कोडे चाहत्यांना पडले होते.

हे वाचा:   एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण ऐकून तुम्हालाही येईल उलटी

मुलाखतीत याबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “मी नेहमीच याबाबत खंत करत आले आहे. पण मला ऑफर करण्यात आलेल्या भूमिकांपैकी मला एकही भूमिका भावली नाही. पण जर काही रोमांचक आणि मजेदार चित्रपटाची ऑफर असेल तर मी ती नक्कीच स्वीकारेन. कोणतीही गोष्ट कधीही नाकारू नये, असे मला वाटते. देवाच्या कृपेने प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम मिळत आहे आणि मला अनेक ऑफर्सही येत आहेत. पण जर खरोखरच काही रोमांचक भूमिका असेल आणि ती मला आवडली तर मी ती नक्कीच करेन.”

मलायका अरोरा २०१४ मध्ये ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती ‘डॉली की डोली’ आणि ‘पटाखा’ सारख्या चित्रपटांमध्ये नृत्य करताना दिसली होती. तसेच गेली काही वर्ष ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोची ती जजही आहे. त्यामुळे आता ती कधी तिची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची कधी घोषणा करतेय याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply