या प्रसिद्ध गायकाला आला हार्ट अटॅक? चाहते चिंतेत तर मॅनेजरने सांगितलं सत्य

Uncategorized

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अनेक असे रिपोर्ट्स समोर आले आहेत. समोर आलेल्या बातमीने चाहते मोठ्या चिंतेत आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या या गायकाची तब्येत जाणून घ्यायची आहे. पण या बातमीमागे काय सत्यता आहे, घेऊया जाणून.

   

उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं सत्यसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक वृत्तानंतर उदित यांच्या मॅनेजरने यामागचं सत्य सांगितलं आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं (Udit Narayan Heart Attack Fake News) आहे.

उदित यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. उदित यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त त्यांच्या मॅनेजरने फेटाळले आहे. ते पूर्णपणे ठीक असल्याचे आणि त्यांना काहीही न झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे वाचा:   गोळ्या खाऊन गर्भपात...'; तुनिषाच्या मैत्रिणीच्या दाव्यानं पुन्हा खळबळ, शिझानवर गंभीर आरोप

मीडिया रिपोर्टनुसार बुधवारी रात्रीच उदित आणि त्यांच्या मॅनेजरची बातचीत झाली. ट्विटरवर हार्ट अटॅकचे वृत्त ट्रेंड झाल्यामुळे गायक उदित काळजीत होते. त्यांना सातत्याने फोन कॉल्स येत होते. यामुळे ते खूपच अस्वस्थ होते.

उदित यांच्या मॅनेजरने अशी माहिती दिली की, त्यांचा असा संशय आहे की हे वृत्त नेपाळमधून पसरले आहे. कारण ज्या मोबाइल क्रमांकावरुन हा मेसेज व्हायरल झाला त्यावर नेपाळचा कोड आहे. ही बातमी कोणी पसरवली असा प्रश्न उदित नारायण यांच्या मॅनेजरला पडला आहे.

पण मॅनेजरने दिलेल्या अपडेटनंतर चाहत्यांचा हा आवडता गायक एकदम ठणठणीत असल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Leave a Reply