‘रामायण’मालिकेत रावण साकारणाऱ्या अभिनेत्याने हेमा मालिनींच्या लगावली होती कानशिलात, वाचा नेमकं काय घडलं होतं

Uncategorized

‘रामायण’ या विषयावर आजपर्यंत अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती झाली आहे. पण रामानंद सागर यांच्या रामायणाने प्रेक्षकांच्या मनात मिळावलेली जागा काही वेगळीच आहे. टीव्हीवर प्रसारित झालेल्या या मालिकेला त्या काळी बरीच लोकप्रियता मिळाली होती. जेवढी प्रसिद्धी राम म्हणून अभिनेता अरुण गोविल यांना मिळाली तेवढीच रावण म्हणून अरविंद त्रिवेदी यांनाही मिळाली होती.

   

अरविंद त्रिवेदी यांनी ‘रामायण’ व्यतिरिक्त काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यामुळेच ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होते. एकदा अरविंद त्रिवेदी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या २० वेळा कानशिलात लगावली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं घेऊयात जाणून…

७० च्या दशकात तयार झालेल्या ‘हम तेरे आशिक हैं’ या चित्रपटात हेमा मालिनी आणि जितेंद्र यांची जोडी दिसली होती. याच चित्रपटात अरविंद त्रिवेदी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि चित्रपटात त्यांचा हेमा मालिनी यांच्यासह एक सीन होता. या सीनमध्ये त्यांना हेमा मालिनी यांच्या जोरात कानशिलात मारण्याचा अभिनय करायचा होता.

हे वाचा:   करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल

पण ते असं करू शकत नव्हते. हेमा मालिनी यांच्यासह तो सीन करताना त्यांना संकोच वाटत होता. कारण त्यावेळी हेमा मालिनी या एक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे हा सीन देण्यासाठी अरविंद त्रिवेदी यांनी तब्बल २० रिटेक दिले.

रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. ते म्हणाले, “मी त्यांना गुजराती मंचमधून निवडलं होतं. ते एक दमदार अभिनेते होते. पण त्यांनी नेहमीच त्यांच्या भावासह काम केलं होतं. त्यांनी ‘हम तेरे आशिक हैं’मध्ये हेमा मालिनी यांच्यासह काम केलं होतं.

या चित्रपटात त्यांचा एक सीन होता ज्यात त्यांना हेमा मालिनी यांना जोरदार कानशिलात लगावायची होती. यासाठी त्यांनी २० रिटेक घेतले होते. नंतर हेमा यांनी अरविंद त्रिवेदींना समाजावलं की, त्या मोठ्या स्टार आहेत हे विसरून हा सीन पूर्ण करायला हवा. त्यानंतर अरविंद यांनी हा सीन पूर्ण केला होता.”

हे वाचा:   Ravi Jadhav: दिग्दर्शक रवी जाधव वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

दरम्यान अरविंद त्रिवेदी यांनी बऱ्याच गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा त्यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेबाबत कळलं तेव्हा त्यांनी गुजरात सोडून मुंबई गाठली. या मालिकेतील ‘केवट’ या भूमिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती.

त्यावेळी रावणाच्या भूमिकेसाठी अमरिश पुरी यांचं नाव बरंच चर्चेत होतं. पण जेव्हा रामानंद सागर यांनी अरविंद त्रिवेदी यांची बॉडी लँग्वेज आणि अॅटीट्यूड पाहिला तेव्हा त्यांनी अरविंद यांना रावणाच्या भूमिकेसाठी साइन केलं.

Leave a Reply