हाडं तुटली, चेहरा बिघडला; ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीने सांगितल्या ‘त्या’ भयंकर अपघाताच्या आठवणी

Uncategorized

सिनेप्रेमींना ‘आशिकी’ (Aashiqui) हा चित्रपट आणि त्यातील गाणी चांगलीच माहीत असतील. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) ही रातोरात स्टार बनली होती. बॉलिवूडमधील (Bollywood) हा तिचा पहिलाच चित्रपट होता.

   

करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने अनुला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मात्र काही वर्षांनंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. चाहत्यांना तिच्या चित्रपटांची प्रतीक्षा होती. मात्र त्यावेळी अनुला भयंकर अपघाताचा सामना करावा लागला होता. या अपघाताने अनुचं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं.

या अपघातात अनुच्या शरीराला बरीच दुखापत झाली होती. तिचा चेहरासुद्धा पूर्णपणे बिघडला होता. त्यातून सावरण्यास तिला बराच काळ लागला. आता बऱ्याच वर्षांनंतर अनु अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुला पुन्हा एकदा इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. मात्र तिच्यासाठी ते आता तितकं सोपं नाही.

हे वाचा:   ‘अक्षय कुमार’सोबत काम करण्यासाठी पूर्ण कपडे काढायला तयार झाली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आणि शेवटी खरंच काढले होते..

1990 मध्ये सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर 1999 मध्ये अनुचा अपघात झाला होता. अपघाताच्या भयानक आठवणी सांगताना अनु ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “तो काळ फक्त कठीण नव्हता. तर तो माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. मी कोमामध्ये होती. मी जगू शकेन की नाही, असा प्रश्न कुटुंबीयांना होता. जर वाचले तर मी पॅरालाइज्ड होईन की काय, अशीही भीती होती.”

जवळपास 29 दिवसांनी अनु कोमातून बाहेर आली होती. मात्र त्यानंतर बराच काळ ती बेडवरून उठू शकत नव्हती. कारण तिचं अर्ध शरीर हे पॅरालाइज्ड होतं. त्या घटनेमुळे केवळ माझ्या शरीरावरच नाही तर माझ्या मानसिक स्वास्थ्यावरही खोलवर परिणाम झाला होता.

हे वाचा:   “दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, “भ्रष्टाचार…”

“मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण शरीरात अनेक फ्रॅक्चर्स होते. पण मी पूर्णपणे बरी होईन, असा मला विश्वास होता. माझ्यासाठी तो पुनर्जन्मच होता”, असं तिने पुढे सांगितलं.

ग्लॅमरच्या विश्वात दिसण्याला सर्वाधिक महत्त्व असतं आणि या अपघातात अनुचा चेहराच खराब झाला होता. तिला कॉस्मेटिक सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. याविषयी बोलताना ती म्हणाली, “अनेकांनी मला प्लास्टिक सर्जरी करण्यास सांगितलं होतं. माझा आताचा चेहरा पाहून लोकांना खरंच वाटतं की मी सर्जरी केली. कारण माझा चेहरा खूप बदलला आहे.”

Leave a Reply