८० वर्षांचे झाले महानायक अमिताभ बच्चन; पाहा त्यांचे न पाहिलेले पडद्यामागचे फोटो

Uncategorized

बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे.

   

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज ८० वर्षांचे झाले आहे. कर्तुत्वाला वयाचे बंधन नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. बॉलिवूडसाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे.

त्यांना कारकीर्दीच्या सुरुवातीला अनेक अडथळ्याचा सामना करावा लागला होता.

१९६९ मध्ये अमिताभ यांचा सिनेसृष्टीतला प्रवास सुरु झाला.

सत्तरच्या दशकामध्ये ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली.

ते पाच दशकांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

अमिताभ यांना प्रत्येक पिढीतल्या कलाकारांसह काम करण्याचा अनुभव आहे.

ते त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

बिग बी अभिनयासह गायन देखील करतात. ते निर्माते आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये ते सूत्रसंचालक म्हणून काम करतात.

हे वाचा:   बॉलीवूड: चित्रात दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती अभिनयाने लाखो मनांवर राज्य करते

इंडियन एक्सप्रेस.कॉमला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना या वयामध्ये इतक्या प्रमाणात काम करायचे कारण विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, “हे माझे काम आहे आणि मला ते करायचे आहे. आजकाल काम मिळवणं फार कठीण आहे.”

त्यांनी पुढे ‘८० व्या वयामध्ये मी ज्या प्रकारचे काम करत आहे त्यात मी समाधानी आहे.’ असे सांगितले.

आजच्या पिढीतील कलाकारांचा हेवा वाटत असल्याची कबूली त्यांनी दिली. अमिताभ म्हणाले, “पहिल्याच चित्रपटामध्ये इतकं चांगलं काम कसं करु शकतात याचं मला आश्चर्य वाटते.”

“मला इथवर पोहचायला पन्नास वर्ष मेहनत करावी लागली. मी त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करत असतो.” असे ते म्हणाले.त्यांना नव्या गोष्टी शिकायची आवड आहे.

अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये व्यग्र आहेत.अमिताभ यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply