Tarak Mehta: ‘तारक मेहता’ फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

Uncategorized

Disha Vakani: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वकानी संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. आणि ती बातमी दिशा वकानीच्या चाहत्यांसाठी वाईट आहे. काही रिपोर्ट्सनुसार दावा केला जात आहे की दिशाला गळ्याचा कॅन्सर झाला आहे. सध्या ती या आजाराशी झुंज देत आहे.

बोललं जात आहे की गळ्याचा कॅन्सर तिला तिच्या दयाबेन या व्यक्तिरेखेमुळे झाला आहे, दिशा तारक मेहता मालिकेत एकदम वेगळ्याच आवाजात बोलायची. तो विशिष्ट आवाज ती त्या व्यक्तिरेखेसाठी काढायची. आणि त्यामुळेच गळ्याचा त्रास सुरु होऊन पुढे तिला कॅन्सरनं ग्रासलं.

दिशा या आजाराशी कधीपासून लढतेय हे मात्र अद्याप कळलेलं नाही.(Taarak Mehta Ka ooltah chashmah dayaben aka disha vakani throat cancer)

हे वाचा:   'धडाकेबाज'मधला कवट्या महाकाल आठवतोय का?, पाहा मास्कमागचा चेहरा

दिशा वकानीनं २०१९ मध्येच मालिकेला रामराम ठोकला होता. यामागचं कारण तिनं मॅटर्निटी लीव्ह घेतली आहे असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर तिचे चाहते तिनं शो मध्ये परत यावं याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मेकर्सनी शो मध्ये परत येण्यासाठी दिशाला अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न के ला. पण दिशानं प्रत्येक वेळा आपला नकारच कळवला. दिशाची ‘दयाबेन’ ही व्यक्तिरेखा शो मध्ये महत्त्वाची होतीच पण प्रेक्षकांची फेव्हरेटही होती.

दिशा वकानी 2010 मध्ये एके ठिकाणी दयाबेनच्या स्टाइलमध्ये बोलायला गेली तेव्हा खूप विचित्र आवाज तिनं काढला होता. तेव्हा ती म्हणाली होती,” प्रत्येक वेळेस तसा आवाज काढणं किंवा तसं बोलणं कठीण होऊन बसतं.

पण देवाची कृपा आहे माझ्या मूळ आवाजाला यामुळे अद्याप काही नुकसान झालं नाही,किंवा कधी गळ्याचा त्रासही झाला नाही”. दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी दिशा दिवसातून जवळपास-११ ते १२ तास शूटिंग करायची, म्हणजे तितके तास तिला हा असा आवाज काढायला लागायचा.

हे वाचा:   गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

जेव्हापासून दिशा वकानीनं शो सोडला आहे ,तेव्हापासून तारक मेहता मालिकेतील तिची व्यक्तिरेखाही लोकांना दिसलेली नाही, मेकर्सनी तिच्या ऐवजी नवीन अभिनेत्रींचा शोध सुरु केला होता. ऐश्वर्या सखुजा आणि काजल पिसल सारख्या अभिनेत्री दयाबेन साकारतायत अशा बातम्या कानावर पडल्या देखील होत्या.

पण या सगळ्या अफवाच होत्या हे नंतर कळलं. दिशा वकानीनं मालिका सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी मालिका सोडल्याचं देखील समोर आलं होतं.

Leave a Reply