अनुष्का शर्माच्या आधी या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता विराट कोहली, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Uncategorized

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरं करत आहे. विराट आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. विवाहानंतरही हे जोडपं जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय असते. मात्र विराटचं नाव कथितरीत्या काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्याची चर्चाही झाली होती. आज आपण जाणून घेऊयात अनुष्कापूर्वी किंग कोहलीच्या जीवनात आलेल्या किंवा नाव जोडण्यात आलेल्या अभिनेत्रींबाबत.

   

विराट कोहलीने २०१७ च्या अखेरीस अभिनेत्री अनुष्का शर्माशी विवाह केला होता. क्रिकेट असो वा बॉलिवूड दोन्हीकडे या जोडप्याची चर्चा होत असते. २०२१ मध्ये अनुष्का आणि विराटला कन्यारत्न झाले होते. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं होतं.

विराट कोहलीची क्रिकेटमधील कारकीर्द सुरुवातीच्या टप्प्यात असताना त्याचं नाव हिंदी आणि तामिळ चित्रपटांमधील अभिनेत्री सारा जेन डायस हिच्याशी जोडण्यात आलं होतं. मात्र नंतर या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं होतं.

हे वाचा:   लाखात एक बुद्धिमान माणुस या फोटोत किती हत्ती आहेत हे सांगू शकतो, फोटो ZOOM करा आणी उत्तर द्या

विराट कोहलीशी नाव जोडण्यात आलेल्यांमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री आणि मॉडेल संजना गलरानी हिचाही समावेश आहे. आयपीएलदरम्यान दोघेही जवळ आले होते, असं सांगण्यात येतं. मात्र संजना गलरानी हिने विराट आणि मी केवळ मित्र होते, स्पष्ट केलं होतं.

अमिर खानच्या तलाश चित्रपटामधून आपला प्रवास सुरू करणारी अभिनेत्री इझाबेल लिटे (Izabelle Leite) ही काळी काळ विराटची गर्लफ्रेंड होती. २०१३ मध्ये इझाबेल हिच्यासोबत असलेली रिलेशनशिप विराट कोहलीने कन्फर्म केली होती. मात्र नंतर ते वेगळे झाले.

माध्यमातील रिपोर्ट्सनुसार दक्षिणेतील प्रख्यात अभिनेत्री तमन्ना भाटिया हिलाही विराट कोहलीने डेट केले होते. दोघांनीही एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं. मात्र तमन्नाने हा अहवाल फेटाळून लावला होता.

Leave a Reply