आलिया भट्ट पाठोपाठ मराठमोळी अभिनेत्री झाली आई, बाळाचा Photo शेअर करत म्हणाली-

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री आई झाली आहे. छोट्या पडद्यावरील‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतील ऋचा हसबनीस हिनं मुलाला जन्म दिला आहे. खुद्द ऋचानं सोशल मीडियावर बाळाचा सुंदरसा फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. ऋचानं ही बातमी शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   

ऋचानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या नवजात बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. ‘ हा आहे रुहीचा साथीदार…मुलगा झाला आहे’, अशी छोटीशी पोस्ट तिनं हा फोटोबरोबर शेअर केली आहे. ऋचानं शेअर केलेल्या पोस्टवर सहकलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करूत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचा:   ‘आमच्या नात्याला लेबल नाही…’, ‘त्या’ अभिनेत्याच्या आठवणीत तब्बू आजही एकटीच

छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेमुळे ऋचा घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत तिनं राशी ही भूमिका साकारली आणि त्यातूनच तिला अफाट लोकप्रियता मिळाली. ऋचानं २०१५ मध्ये राहुल जगदाळे याच्याशी लग्न केलं. या दोघांना पहिली मुलगी असून तिचं नाव रुही आहे. ऋचा गेला बराच काळ कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. ऋचानं तिला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Leave a Reply