आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव आहे खूपचं खास, अर्थ माहितीये का?

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने आपल्या मुलीचे नाव सांगितले आहे. त्या पोस्टमध्ये आलियाने तिच्या मुलीची पहिली झलकही दाखवली आहे.

   

आलियाने पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या मुलीचे नाव ‘राहा’ कपूर (Alia Daughter Name) आहे. यासोबतच आलियाने असेही सांगितले की, मुलीचे नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूर यांनी ठेवले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीच्या नावाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.

तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राहा म्हणजे दैवी मार्ग. पण राहाचा स्वाहिलीमध्ये आनंद असा इतरही अर्थ आहे. संस्कृतमध्ये याचा अर्थ पूर्वज आहे. बंगालीमध्ये याचा अर्थ आराम आहे. अरबीमध्ये याचा अर्थ शांती आहे. तसेच राहा म्हणजे आनंद, स्वातंत्र्य आणि आनंदा देणारा.

हे वाचा:   जीममध्ये न जाता रिक्षावाला झाला बॉडी बिल्डर, ५३ व्या वर्षी बनवली अशी बॉडी पाहूनच हादराल

कन्येच्या आगमनाने कपूर कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया म्हणाली, मी, रणबीर कपूर, माझे मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांबाबतही या गोष्टींवर नेहमी बोलते. लोकप्रिय असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष सतत माझ्या मुलीवर असणार हे खरे आहे. त्यामुळे या सगळ्यात मुलीला मोठे करण्याची चिंता मला सतावत असते.

माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणी डोकावलेले मला आवडणार नाही. आलियाची मुलगी आहे म्हणून माझ्या मुलीला प्रसिद्धी मिळालेलीही आवडणार नाही. तू आणि रणबीर दोघेही कलाकार आहात. तुमच्या मुलीनेही अभिनेत्री बनायचे ठरवले तर, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.

यावर आलिया म्हणाली, अशा गोष्टी माझ्या हातात नाहीत. त्यामुळे मी याचा विचारही करत नाही. सेलिब्रिटी किंवा अभिनेत्री व्हायचे की, नाही हा माझ्या मुलीचा निर्णय असेल. तिने काय करावे, याचे नियोजन मी करू शकत नाही.

हे वाचा:   68 वर्षीय आजोबाने 24 वर्षीय नातीला केलं प्रेग्नेंट, नंतर केलं लग्न; सत्य समोर आल्यावरही दिला नाही घटस्फोट

Leave a Reply